एक्स्प्लोर

महाराष्ट्र विधीमंडळात नातलगांचा मेळा दिसणार, घराणेशाही मात्र थांबेना

सक्रिय राजकारणात घराणेशाहीचा आणि नात्यागोत्यांचा हा पॅटर्न आज पवार, देशमुख, चव्हाण, मुंडे, विखे पाटील व्हाया आज ठाकरे परिवारापर्यंत येऊन पोहोचला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून तर पुत्र आदित्य ठाकरे आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दिसतील.

मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात काही परिवारांचे वर्चस्व आणि त्याच परिवाराच्या वाट्याला सगळी राजकीय पदं उपभोगायला मिळत असल्याचे चित्र आहे. या विधानसभेच्या निकालानंतर आणि नवे सरकार स्थापन झाल्यानंतर विधीमंडळात नातलगांचा मेळा पाहायला मिळणार आहेत. सक्रिय राजकारणात घराणेशाहीचा आणि नात्यागोत्यांचा हा पॅटर्न आज पवार, देशमुख, चव्हाण, मुंडे, विखे पाटील व्हाया आज ठाकरे परिवारापर्यंत येऊन पोहोचला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून तर पुत्र आदित्य ठाकरे आमदार म्हणून पहिल्यांदाच विधानसभेत दिसतील. पवार फॅमिलीची 'पॉवर' राज्याच्या राजकारणात जबरदस्त आहे, ती देखील या राजकीय गोंधळात जास्त तीव्रतेने दिसून आली आहे. काका अजित पवार यांच्यासोबत आता पुतणे रोहित पवार देखील विधानसभेत दिसतील. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांचे भाचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे देखील सभागृहात असणार आहेत. एरव्ही थेट निवडणुकीचं राजकारण न करता पक्ष चालवणाऱ्या ठाकरे कुटुंबातील एका नाही तर दोन सदस्य थेट विधीमंडळात दिसणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने त्यांना येत्या सहा महिन्यात आमदार म्हणून निवडून यावं लागेल तर पुत्र आदित्य वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्याचे आणि देशाचे राजकारण गाजवले. त्यांचे दोन्ही पुत्र आता राज्याच्या राजकारणात दिसतील. अमित देशमुख लातूर शहरातून तर धाकटे चिरंजीव धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं नाव म्हणजे डी वाय पाटील. त्यांचे नातू ऋतुराज पाटील कॉंग्रेसच्या तिकीटावर कोल्हापूर दक्षिणमधुन निवडून आले तर काका सतेज पाटील परिषदेवर आमदार आहेत. हे देखील वाचा - महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरचा गोतावळा, घराणेशाहीचा रुबाब कायम रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनमधून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. त्यांचे बंधू अनिकेत तटकरे कोकण पदवीधरचे आमदार म्हणून विधानपरिषदेत आहेत. बहुजन विकास आघाडीचे वसई आणि नालासोपाऱ्यातील आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितीज ठाकूर बापलेकाची जोडी निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले आहेत. माढ्यातले शिंदे बंधू देखील विधानसभेत दिसणार आहेत. माढा मतदारसंघातून बबनराव शिंदे राष्ट्रवादीकडून तर करमाळातून त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी विजय मिळवला आहे. दापोलीमधून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. रामदास कदम गेल्या सरकारमध्ये मंत्री होते. या सरकारमध्ये देखील त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कुलाब्यातून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून विधानसभा गाठली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nursing Exam Paper Leak: नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?
नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचा पेपरही फुटला, परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा; बहिणीसाठी व्हॉट्सॲपवर पाठवली प्रश्नपत्रिका, नेमकं काय घडलं?
Sugar Price Hike: साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
साखरेच्या वाढत्या दरवाढीबद्दल राज्य सरकारचं केंद्राला पत्र; खाण्याच्या अन् व्यवसायाच्या साखरेचे दर वेगळे ठेवा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांची मागणी
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Embed widget