एक्स्प्लोर
सलग नवव्या दिवशी पेट्रोल स्वस्त, मुंबईत 25 पैशांची घट
पेट्रोलच्या दरात आज 25 पैशांची तर डिझेलच्या दरात 7 पैशांनी घट झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर 86.33 प्रति लिटर, तर डिझेलचे दर 78.33 रुपये इतका आहे. गेल्या 9 दिवसांत पेट्रोलचा दर 1.96 रुपये कमी झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील पेट्रोलच्या दरात किरकोळ घट झाली असून डिझेलचे भाव देखील कमी झाली आहेत.

मुंबई : पेट्रोलच्या दरात आज 25 पैशांची तर डिझेलच्या दरात 7 पैशांनी घट झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर 86.33 प्रति लिटर, तर डिझेलचे दर 78.33 रुपये इतका आहे. गेल्या 9 दिवसांत पेट्रोलचा दर 1.96 रुपये कमी झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये देखील पेट्रोलच्या दरात किरकोळ घट झाली असून डिझेलचे भाव देखील कमी झाली आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव 81.10 वरून कमी होत 80.85 रुपये झाला आहे डिझेलचा भाव 74.80 रुपयांवर 74.73 पैसे झाला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये देखील पेट्रोल काही पैशांनी स्वस्त झाले आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत असल्या तरी नागरिकांना मोठा दिलासा मात्र मिळताना दिसत नाही. केंद्र सरकार आणि पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरात अडीच रुपये कमी करण्यात आल्यांनतर राज्य सरकारनेही पेट्रोलमध्ये अडीच रुपये कमी करत दिलासा दिला होता. मात्र यानंतर पुन्हा सातत्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच राहिले. गेल्या 9 दिवसांपासून मात्र रोज दरांमध्ये घट होत आहे. देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणं आमच्या हातात नाही असं सरकार सांगत असलं तरी सरकारने इंधनावर जो कर आकारला आहे, तो कमी करणं सरकारच्या हातात आहे. या कराच्या दृष्टीने पाहिलं तर राज्यात सर्वाधिक कर आहे. देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर 39 टक्के (+कर) वॅट वसूल केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या करांचा समावेश आहे. दुष्काळी कर तीन रुपये, महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये, शिक्षण कर एक रुपया, स्वच्छ भारत अभियानचा एक रुपया, कृषी कल्याण अभियान एक रुपया असा एकूण नऊ रुपये कर आकारला जातोय. सुप्रीम कोर्टाने महामार्गांलगतच्या दारु विक्रीवर बंदी आणली होती. त्यानंतर राज्य सरकारने महसुलात घट झाल्याचं कारण देत पेट्रोल आणि डिझेलवर तब्बल तीन रुपये कर आकारणी सुरु केली. काही काळाने दारु विक्रीही सुरु झाली, पण कर कायम आहे. तर 2014-15 सालच्या दुष्काळात आकारलेला तीन रुपये करही अजून कमी केलेला नाही.
आणखी वाचा























