Parbhani News Update : कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्या आधीच आज परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्वाभिमानीचे कार्यकर्ते कृषी मंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या मदतीची मागणी करणार होते. परंतु, त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घतेले. पोलिसांच्या या कृत्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकरून निषेध व्यक्त करण्यात आलाय.
परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे काही ठिकाणी अतिवृष्टीने तर काही ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत कृषी मंत्री अब्दुल सत्तार आज यांना आज भेटून मदतीची मागणी करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र आले असताना त्यांना कृषीमंत्र्यांच्या भेटी आधीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज परभणी दौऱ्यावर असून ते हिंदू गर्व गर्जना यात्रेनिमित्त विविध ठिकाणी शाखांचे उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा घेत आहेत. मात्र या दौऱ्या दरम्यान परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी तत्काळ मदत देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी त्यांच्या कार्यालयात जमले असता पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे सांगितले. "शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे सुरू आहेत, शिवाय पीक कापणी प्रयोग सुरू आहेत आणि यानंतरच शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
"कोण कुठे जाणार ये वक्त बतायेगा"
मंत्री सत्तार यांनी परभणी बोलताना कोण कुठे जाणार हे येणारा काळ सांगेल असे सूचक विधान केले. शिवाय न्यायालयाने काल शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्यासाठी परवानगी घेण्याच्या निर्णयाचं पालन करू असेही अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या