पालघर : कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे पालघर जिल्ह्यातील (Palghar News) कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षक शास्त्रज्ञ प्राध्यापक उत्तम साने यांनी जंगली मधमाशांच्या प्रकारातील फुलोरी मधमाशीपालनासाठी जगातील पहिली पेटी तयार केली आहे. कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्यामार्फत नेहमीच शेतकऱ्यांना पूरक ठरतील असे नवनवीन प्रयोग केले जातात. त्यातच मधमाशीपालनासाठी कोसबाड फुलोरी मधपेटीचा निर्मिती या कृषी विज्ञान केंद्रातील प्राध्यापक यांनी केल्यानंतर त्यांचा सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
कोकणात शेती बरोबरच येथे असलेल्या फळ आणि फुल बागायतदार शेतकरी मधमाशी पालनाकडे पर्यायी व्यवसाय म्हणून बघतात. मात्र त्यातही नैसर्गिकरित्या निर्माण होणाऱ्या मधमाशी पालनाला अधिक मागणी आहे. हीच बाब लक्षात घेऊन डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्राध्यापक उत्तम सहाणे यांनी जंगली मधमाशांच्या प्रकारातील फुलोरी मधमाशी पालनासाठी पेटी तयार केली. या पेटीला त्यांनी कोसबाड फुलोरी मधपेटी असं नाव दिलं आहे. याचे पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा दावा सहानी यांनी केला आहे.
मधपेटी तयार करण्यासाठी कमी खर्च
ही मधपेटी तयार करण्यासाठी कमी खर्च येत असून आकाराने लहान असल्याने परागीभवनासाठी अन्य ठिकाणी नेण्यासाठी ही मतपेटी सहज शक्य आहे. पेटीवर लाकडी झाकण तर चारही बाजूंनी लाकडी पट्ट्यांचा असलेला पिंजरा या मधमाशांच्या पोळ्यांचा संरक्षण करणार आहे . माशा आणि मधपोळ्याचा जास्त नुकसान न करता या पेटीतील मधमाशांचे पोळ सहज बाहेर काढणं शक्य असल्याने पुन्हा त्या पेटीत ही पोळी पूर्ववत करता येणार आहेत. पेटीच्या विशिष्ट रचनेमुळे बाहेरूनच वसाहतीचा निरीक्षण करता येणार असून सातेरी किंवा मेली फेऱ्याच्या पेटी प्रमाणे ही पेटी वारंवार उघडण्याची ही गरज भासणार नसल्याची माहिती यावेळी प्राध्यापक सहाने यांनी दिली
फुलोरी मधमाशीचे पोहे हे झाडाच्या फांदीला साधारणतः दहा ते वीस फुटांच्या उंचीवर असते आतापर्यंत मेलीफेरा आणि सातेरी मधमाशांसाठी पेट्या विकसित करून मध उत्पादनासाठी वापर झाला आहे. मात्र उजेडात राहणाऱ्या फुलोरा या जंगली मधमाशीचा उपयोग मधमाशीपालनासाठी झाला नव्हता. कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने केलेल्या या अनोख्या संशोधनाचा राज्य आणि देशातील मधमाशी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.
हे ही वाचा :