Palghar News : एकीकडे देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्याच नसल्याचं चित्र आहे. गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा (Twins) मृत्यू झाला. पालघर (Palghar) जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटना घडली. 


या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला. परंतु आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिला तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू डोळ्यादेखत पाहावा लागल्याची हृदयद्रावक घटना घडली. 


या गावातील ही दुसरी घटना आहे. रस्ता नसल्याने दोन-तीन महिलांना डोलीतून दवाखान्यात नेण्याची वेळ आली होती. मोखाडा तालुक्यात अशी अनेक गावं आहेत ज्यात सुविधा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.


स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मूलभूत सुविधांची वानवा
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सारख्या प्राथमिक सुविधा आदिवासींना मिळालेल्या नाहीत. आजही येथील आदिवासींना रस्त्याअभावी डोलीकरुन पायपीट करत दवाखान्यात जावं लागत आहे. तर वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने प्राण गमवावे लागत आहेत.


पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांना अजूनही रस्ताच नाही, तर मग अॅम्ब्युलन्स येणार तरी कुठून? ग्रामस्थ अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता वर्षानुवर्षे रुग्णांना, गरोदर महिलांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी  झोळीचा आधार घेतात. रुग्ण महिलेला डोलीत किंवा झोळी ठेवून दवाखान्यात पोहोचवावं लागतं. परंतु  ऐन पावसाळ्यात मरकटवाडीमध्ये गर्भवतीला डोलीतून नेण्याची वेळ आली आणि तिला तिच्या जुळ्या बाळांना गमवावं लागलं.


गरोदरपणात या भागातील महिला नातेवाईकांकडे जातात
दरम्यान जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यातील गरोदर महिलांना प्रसुतीची वेळ, तारीख जवळ आली की तालुक्याच्या ठिकाणी, त्यांच्या नातेवाईकांकडे येऊन थांबावं लागतं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Palghar : रुग्णांना झोळीत बांधून, वाहती नदी पार करून रुग्णालयात दाखल; भाटीपाड्यातील विदारक स्थिती


Palghar Rains : नाल्याला पूर, पुलावरुन पाणी; प्रसंगावधान दाखवून रुग्णवाहिका चालकाने गरोदर मातेला सुखरुप आरोग्य केंद्रात पोहोचवलं!


Palghar : रुग्णाला न्यायला प्लॅस्टिक, चादरीची डोली! भर पावसात पायपीट; मुंबईनजीक पालघरच्या ग्रामीण भागातील उपेक्षा