पालघर : पालघर (Palghar News)  जिल्ह्यात शेती पूरक व्यवसायांवर 70 टक्क्यांहून अधिक शेतकरी अवलंबून आहेत.  पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भागात बागायतदार शेतकऱ्यांची ही मोठी संख्या आहे.  पश्चिम किनारपट्टी भागात पिकवला जाणारा भाजीपाला हा मुंबई ठाणे महानगर मध्ये विक्रीसाठी येतो मात्र सध्या येथील हजारो बागायतदार शेतकरी गोगलगाईंपासून (Snail) त्रस्त आहेत . या भागात पिकांवर आणि रोपांवर गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला असून या गोगलगायी शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहेत .


पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुमारास वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड केली जाते. या वेलवर्गीय भाजीपाल्यांचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास उत्पन्न येण्यास सुरुवात होतं. सध्या पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर वेलवर्गीय आणि फळ वर्गीय भाजीपाला बहरला असून बागायतदार शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत होतं. मात्र सध्या या भाजीपाल्याच्या खोडांवर आणि तयार झालेल्या पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला असून हे गोगलगाय शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे . यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांनाही सुगीचे दिवस आले होते. मात्र उत्पन्न येण्याआधीच वेलवर्गीय फळभाज्यांवर गोगलगाईंचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत . 


गोगलगायी नष्ट करण्याची मोठी समस्या


 किटकांना रोखण्यासाठी वेलवर्गीय फळभाज्यांवर कीटकनाशक फवारणी केली जात असली तरी रात्रीच्या सुमारास बाहेर पडणाऱ्या या गोगलगाय वर उपाययोजना करणे ही शेतकऱ्यांसाठी ही मोठी तारेवरची कसरत आहे. गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढल्याने या गोगलगायी नष्ट करण्याची मोठी समस्या सध्या येथील शेतकऱ्यांसमोर उभी राहिले आहे. रात्रीच्या सुमारास बाहेर पडणारी ही गोगलगाय रात्रीत पीक नष्ट करत असून या गोगलगायीचा बंदोबस्त करायचा कसा असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे . 


गोगलगायींमुळे येथील बागायत शेती संकटात


पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात जवळपास 25 हजार हेक्टरवर बागायती शेती करत आहेत.त्यामुळे अनेक कुटुंब ही बागायत शेतीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात याच बागायती शेतीवर अनेक कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे या भागात उत्पादित होणार पीक फळभाज्या, वेलवर्गीय भाज्या मिरची तसेच फुल  रोज मुंबई ठाणे या महानगरांमध्ये विक्रीसाठी नेलं जातं मात्र सध्या गोगलगायींमुळे येथील बागायत शेती संकटात सापडली आहे. त्यामुळे येथील शेतकरी बागायतदार देशोधडीला लागण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत. प्रशासनाकडून यावर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. 


हे ही वाचा :


जपानी रेड डायमंड पेरुची शेती करा, लाखोंचा नफा मिळवा ; वाचा 'या' शेतीबद्दल सविस्तर माहिती