Agriculture News : शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करुन भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. पारंपारिक शेती पिकांना बगल देत आधुनिक पद्धतीनं शेती करत आहेत. तुम्हाला जर कमी खर्चात भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही जपानी रेड डायमंड पेरुची शेती (japanese red diamond guava) करु शकता. इतर पेरुच्या तुलनेत बाजारात जपानी डायमंड पेरुला मोठी मागणी असते. ते पेरु अधिक महाग विकले जातात. बाजारात जपानी डायमंड पेरुचा दर हा 100 ते 150 रुपये प्रतिकिलो राहतो. जर तुम्ही शेती केली तर तुमचे उत्पन्न तिप्पट वाढेल.
पेरुमध्ये सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमीन सी
पेरु खायला सगळ्यांनाच आवडते. त्याची लागवड जवळपास संपूर्ण भारतात केली जाते. त्याचा दरही संपूर्ण देशात जवळपास सारखाच आहे. पेरुमध्ये अनेक जीवनसत्त्वे आढळतात. पण त्यात सर्वात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. याशिवाय पेरुमध्ये लोह, चुना आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्ही नियमितपणे पेरुचे सेवन केले तर तुमचे शरीर निरोगी आणि ताजे राहते. त्यामुळं भारतात पेरुच्या अनेक जातींची लागवड केली जाते. पण आज आपण अशा एका जातीबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्या लागवडीमुळं शेतकरी श्रीमंत होईल.
जपानी डायमंड पेरुला बाजारात 100 ते 150 रुपयांचा दर
भारतात पेरु साधारणपणे 40 ते 60 रुपये किलोने विकला जातो. पण जपानी रेड डायमंड हा पेरूचा एक प्रकार आहे ज्याचा दर खूप जास्त आहे. हे पेरु त्याच्या चव आणि गोडपणासाठी ओळखले जातात. बाजारात 100 ते 150 रुपये किलो दरानं हा पेरु विकला जातो. त्याची लागवड करणारे शेतकरी काही वर्षांत श्रीमंत होतात. विशेष म्हणजे अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी जपानी रेड डायमंड पेरुची लागवडही सुरू केली आहे.
जपानी रेड डायमंड पेरुच्या लागवडीसाठी 10 अंश सेल्सिअस ते 42 अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते. त्याच्या लागवडीसाठी, मातीचे पीएच मूल्य 7 ते 8 दरम्यान असावे. काळ्या आणि वालुकामय चिकणमातीमध्ये जपानी रेड डायमंड पेरुची लागवड केल्यास बंपर उत्पादन मिळेल. विशेष म्हणजे शेतात जपानी डायमंड पेरताना ओळीतील अंतर 8 फूट असावे. त्याच वेळी झाडांमधील अंतर 6 फूट ठेवावे. त्यामुळं झाडांची वाढ झपाट्याने होते. याशिवाय झाडांची छाटणीही वर्षातून दोनदा करावी लागते.
जपानी रेड डायमंड पेरूच्या लागवडीतून मिळवा लाखोंचा नफा
इतर पिकांप्रमाणे, जपानी रेड डायमंड पेरूच्या शेतात शेणखताचा वापरा करा. त्यामुळं जमिनीची सुपीकता वाढते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही एनपीके सल्फर, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन खत म्हणून वापरू शकता. त्याचवेळी, झाडांना पाणी देण्यासाठी फक्त ठिबक सिंचन वापरा. त्यामुळं पाण्याचा अपव्यय होत नाही. देशी पेरुच्या लागवडीतून तुम्ही वर्षाला एक लाख रुपये कमावत असाल, तर जपानी रेड डायमंड पेरुच्या लागवडीतून तुमचे उत्पन्न तिप्पट वाढेल. म्हणजेच तुम्हाला एका वर्षात 3 लाख रुपये मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या: