पालघर: बोईसरजवळील खैरापाडा येथे राहणाऱ्या विवाहित महिलेवर अत्याचार (Assault) करुन तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी जिजाऊ संघटनेचा बोईसर विधानसभा अध्यक्ष नरेश धोडी आणि इतर दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने बोईसर (Boisar) विभागात खळबळ माजली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.


नेमकं घडलं काय?


बोईसर जवळील खैरापाडा येथे आपल्या कुटुंबासोबत राहणार्‍या 34 वर्षीय विवाहित महिलेचे एका तरुणासोबत पाच वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते. या दरम्यान महिलेसोबतच्या शारीरिक संबंधाच्या अश्लील चित्रफिती पतीला दाखवण्याची धमकी देण्यात येत होती. यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार महिलेने बोईसर पोलीस ठाण्यात नोंदवली.


गुन्हा दाखल करताच तिन्ही आरोपी फरार


महिलेवर शारीरिक अत्याचार आणि त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी जिजाऊ सामाजिक संघटनेचा बोईसर विधानसभा अध्यक्ष नरेश धोडी, सागर धोडी आणि संतोष यादव या तिघांवर पीडित महिलेच्या तक्रारीनंतर बोईसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी तीन ही आरोपींवर भा.दं.सा. 1860, कलम 376 (2) (न),66 (इ) आणि 67 (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संघटनेतच असा प्रकार?


जिजाऊ संघटना ही महिला सक्षमीकरणासाठी काम करते. बोईसर येथील महिला बलात्कार प्रकरणाशी नरेश धोडी याचा काडीमात्र संबंध नसताना राजकीय नेत्यांनी षडयंत्र रचून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील होत आहे.


हेही वाचा:


Mumbai Crime : मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, पालकांनी चोप देऊन पोलिसांकडे सोपवलं