वसई : वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य महिलेची तिच्याच मुलाने राहत्या घरात गळा चिरुन हत्या (Murder) केली आहे. ही घटना वसई तालुक्यातील देपीवली गावात रविवारी (20 ऑगस्ट) रात्री 10 वाजताच्या सुमारास घडली होती. सुनिता सुनिल घोघरा (वय 36 वर्षे) असे या महिलेचे नाव असून ती याच गावात आपल्या कुटुंबासह राहत होती. ही महिला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूनही आली होती. स्वत:च्या मुलाने आईच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार करत आईची हत्या केली आहे. आरोपी मुलगा 17 वर्षांचा आहे.
आई झोपी गेली असताना मुलगा खोलीत शिरला, कुऱ्हाडीने वार केला
सुनिता घोघरा वालीव परिसरात नोकरीला जात होती रविवार सुट्टी असल्याने या दिवशी ती घरात होती. रात्रीचे जेवण करुन महिला आपल्या खोलीत झोपी गेली असता तिच्या अल्पवयीन मुलाने आपल्या तिच्यावर कुऱ्हाडीने तीन वार करुन घराबाहेर गेला. काही वेळाने मृत महिलेचा पती घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघून तिला उपचारांसाठी भिवंडी येथे रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संबंधित घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत तिचा पतीला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर मुलाची चौकशी केली असता आपणच आईची हत्या केल्याचे मुलाने कबूल केले. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
कार चोरण्याच्या उद्देशाने पालघरमधील चालकाची हत्या
भाड्याने घेतलेल्या कारच्या चालकाची हत्या करत मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकून कार घेऊन पसार झालेल्या तीन आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आलं आहे. पाच दिवसांपूर्वी पालघरमधील कार चालक आसिफ शेख याची कार भाड्यावर घेऊन तीन आरोपी नाशिकसाठी निघाले होते. मात्र कार चोरण्याच्या उद्देशाने रस्त्यातच या आरोपींनी कार चालकाची हत्या करुन त्याचा मृतदेह त्र्यंबकेश्वरच्या आंबोली घाटात फेकला. यानंतर कारचे मालक आणि मृत कार चालकाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पालघर पोलिसांनी सूत्र हलवत पहिल्या आरोपीला ओडिसातून तर दुसऱ्या आरोपीला नागपूर इथून चालत्या ट्रेन मधून अटक केली. या प्रकरणात तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु असून अर्टिका कार देखील ताब्यात घेण्यात आली आहे. कार चालकाची झालेली हत्या ही कार चोरण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याच पोलीस तपासात उघड झालं आहे.
हेही वाचा