पालघर : पावसाळा संपला असून हिवाळ्याची सुरुवात होत आहे, त्यामुळे पावसाळ्यानंतर झालेल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी, निसर्ग पर्यंटनासाठी नागरिक बाहेर पडत आहेत. त्यातच, दिवाळी सुट्ट्यांचं नियोजन करुनही पर्यटनस्थळी फिरण्यास, आनंद घेण्यास जात आहेत. दरम्यान, पालघर (Palghar) जिल्ह्यात पर्यटनासाठी (tourist) आलेल्या दोन तरुणांच्या जीवावर बेतलं. जव्हारच्या काळ मांडवी धबधब्यात बोईसरमधून पर्यटनासाठी गेलेले दोन तरुण बुडाल्याची दुर्दैवी घटना ऐन दिवाळीत घडली. या घटनेनं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
येथील धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या दोन्ही तरुणांचा बुडून मृत्य झाला असून दोघाही तरुणांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. अखिलेश रामदेव मिश्रा (27) आणि खुर्शीद मुस्ताक अहमद नाईक (31) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघा तरुणांची नावे असून ते बोईसर मधील रहिवासी आहेत. दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी बोईसरवरुन जव्हारच्या काळ मांडवी धबधब्यावर गेलेल्या पाच तरुणांपैकी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. बोईसरमधून 5 तरुण फिरण्यासाठी काळमांडवी धबधब्यावर गेले होते, त्यापैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जव्हारचा काळमांडवी धबधबा हा धोक्याचा धबधबा असून दरवर्षी या धबधब्याच्या प्रवाहात बुडून काही लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, येथील पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना अगोदरच प्रशासनाकडून सतर्क केले जाते. दरम्यान, गुरुवारी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीत बुडून 4 ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
माढ्यात 4 जणांचा मृत्यू
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी माढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. माढा तालुक्यातील सीना नदीत यवतमाळ जिल्ह्यातील 4 ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले आहेत. ही घटना तालुक्यातील खैराव येथे घडली आहे. अद्याप यातील एकाही मजुराचा शोध लागला नाही. शोधकार्य सुरु आहे. चार ऊसतोड मजूर सीना नदीपात्रात बुडाले आहेत. हे सर्व मजूर यवतमाळ जिल्ह्यातील आहेत. ऊसतोड करण्यासाठी या भागात आले होते. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. अद्याप यापैकी एकाचाही शोध लागलेला नाही. या दुर्घटनेत बुडलेल्या मजुरामध्ये शंकर विनोद शिवणकर (वय 25), प्रकाश धाबेकर (वय 26), अजय महादेव मंगाम (वय 25), राजीव रामभाऊ गेडाम (वय 26) सर्व रा. लसणा टेकडी ता. जि. यवतमाळ हे ऊसतोड मजूर आहेत.
हेही वाचा
मुंबईत सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग, कामगार अडकल्याची भीती; अग्निशमनच्या 5-6 गाड्या दाखल