एक्स्प्लोर

Pahalgam Terror Attack: भारताची डोकेदुखी वाढणार, लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदने हमासशी काश्मीरमधील कारवायांसाठी हातमिळवणी; धक्कादायक माहिती समोर

Pahalgam Terror Attack: पाकव्याप्त काश्मिरात पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासची एन्ट्री झाल्याची माहिती आहे.

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) आता भारताची डोकेदुखी वाढवणारी माहिती समोर येत आहे. पाकव्याप्त काश्मिरात पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासची एन्ट्री झाल्याची माहिती आहे. लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मदने हमासशी काश्मीरमधील कारवायांसाठी हातमिळवणी केल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्यात आणि इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी झालेल्या हल्ल्यात साम्य असल्याचं दिसून येतंय. 

पहलगाम हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाच्या सैफुल्लासह जैशचा कुख्यात दहशतवादी आणि संस्थापक मसूद अझरचा भाऊ रऊफ असगरही असल्याची शक्यता आहे. सैफुल्ला आणि हमासचा राजनैतिक ब्युरो चीफ खालिद मशाल याची गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये कतारची राजधानी दोहा इथे भेट झाल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे 5 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मिरातील रावळकोट इथे झालेल्या एका रॅलीत जैश, लष्कर ए तोयबासह हमासचे दहशतवादीही सहभागी होते. 

पाकव्याप्त काश्मिरात मदरसे बंद करून तिथल्या विद्यार्थी, मौलवींना AK-47 चालवण्याचं प्रशिक्षण-

पाकिस्तानच दहशतवादाला पोसतो हे काही नवं राहिलेलं नाही. मात्र आता पाकिस्तान किती खालच्या पातळीपर्यंत पडू शकतो याचा ढळढळीत पुरावा हाती लागलाय. पाकव्याप्त काश्मिरात मदरसे बंद करून तिथल्या विद्यार्थी, मौलवींना एके 47 चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. एबीपी माझाच्या हाती हा व्हिडीओ लागलाय. एकीकडे पाकिस्तानने पीओकेतील सर्व मदरसे बंद करून तिथे दहशतवादाचा अभ्यासक्रम सुरू केलाय. नीलम घाटी आणि सुधनोती भागातला हा व्हिडीओ आहे. पाकिस्तानी लष्कराचा कर्नल आसीफ खान याच्या नेतृत्वात हा खुनी खेळ सुरू आहे. 90 च्या दशकातही पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मिरातील स्थानिकांच्या हाती बंदुका देत त्यांना भारताविरोधात वापरलं होतं. पाकिस्तानचे दहशतवादाचे खेळ भारताने वेळोवेळी जगासमोर आणलेत. आता त्यातला हा आणखी एक व्हिडीओ भारताच्या हाती लागलाय.

जम्मू कश्मीर सरकार आणि नॅशल कॉन्फरन्सकडून केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा- ओमर अब्दुल्ला

जम्मू कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  बैठकीत पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात विस्ताराने चर्चा झाली. पहलगाम हल्ल्यानंतर ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्यासाठी जम्मू कश्मीर सरकार आणि नॅशल कॉन्फरन्सकडून केंद्र सरकारला जे सहकार्य अपेक्षित आहे ते सगळं सहकार्य करण्यास तयार असल्याचं ओमर अब्दुल्लांनी सांगितलं. तसंच पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आणि देशाच्या सुरक्षेच्या मुद्दांवर नॅशनल कॉन्फरन्स केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचंही ओमर अब्दुल्लांनी स्पष्ट केलं. अब्दुल्लांच्या भेटीनंतर लगेचच नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठीही पंतप्रधानांच्या भेटीला आले होते. मात्र पंतप्रधान आणि नौदल प्रमुखांमधील चर्चेचा विषय अद्याप स्पष्ट झालेला नाही.  

संबंधित बातमी:

CRPF Munir Ahmed: पाकिस्तानी मुलीसोबत केलाला विवाह लपवला; व्हिसा संपूनही घरात ठेवलं, केंद्रीय पोलीस दलातील कॉन्स्टेबलवर मोठी कारवाई

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
CJP Protest Delhi LIVE Updates: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत, आदित्य ठाकरे पोलीस स्टेशनला पोहोचले
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Abhijeet Dipke: आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव
आजीच्या अंत्यसंस्काराला जायचं की आंदोलनाला? तूच निर्णय घे, दिल्ली पोलिसांचा अभिजीत दीपकेला प्रस्ताव

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
वृद्ध महिलेला संपवलं; एक महिना तपास अन्...; चघळलेल्या सुपारीच्या तुकड्यामुळं सापडला आरोपी, शेजाऱ्यानेच..., गोंदियातील घटनेचा महिन्याने झाला उलगडा
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
सरकार सध्या गुंडगिरीच्या भूमिकेत; दिल्लीत आंदोलकांची धरपकड, अभिजीत दिपकेंना अटक, जरांगे पाटील संतापले
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
Embed widget