एक्स्प्लोर

किसानपुत्रांचा एल्गार ! शेतकऱ्यांसाठी आज एकदिवसीय अन्नत्याग

मुंबई : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांना निषेध करण्यासाठी आज राज्यभरात एकदिवसीय उपोषण करण्यात येतं आहे. शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी या उपोषणाची हाक दिली, असून या उपोषणाला शेतकऱ्यांसह समाजाच्या विविध स्तरातून साथ मिळताना दिसते आहे. मुंबई-पुण्यासह राज्यभरातील अनेक शहरं तसेच गावांमधून लोक उपोषणात सहभागी होत आहेत. 31 वर्षांपूर्वी 19 मार्च रोजी साहेबराव करपे या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने आपल्या कुटुंबासह आत्महत्या केली होती. जाहीररित्या झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. नंतरच्या काळात हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या. सरकारे बदलली, पण शेतकऱ्याचे मरण थांबले नाही. त्यामुळेच शेतकऱ्याच्या वेदनेशी नाते जोडण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे. दरम्यान, करपे कुटुंबियांनी आत्महत्या केलेल्या चिलगव्हाण गावातही गावकऱ्यांकडून चूलबंद आंदोलन करण्यात येतंय. करपे कुटुंबियांच्या वाड्यासमोर काळी रांगोळी काढून गावकऱ्यांकडून उपोषण करण्यात येतंय. शेतकरी नेते अमर हबीब, खासदार राजू शेट्टी ,राज्यमंत्री रविकांत तुपकर, शेतकरी नेते वामनराव चटप आणि चंद्रकांत वानखेडे याठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतलं नियोजन कसं आहे? मुंबईत उपवास सोडण्यासाठी चर्चगेट येथील फ्री प्रेस जर्नल मार्गावरील मनोरा आमदार निवासाजवळ संध्याकाळी 5 वाजता उपोषणातील सहभागी कार्यकर्ते जमणार आहेत. शेतकरी आत्महत्यांशी सहवेदना आणि शेतकरी कायद्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुंबईतही मोठा सहभाग पाहायला मिळतो आहे. अमर हबीब यवतमाळमध्ये उपोषणाला बसणार किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी उपोषणाची हाक दिली असून, ते स्वत:ही या उपोषणात सक्रिय सहभाग घेणार आहेत. अमर हबीब हे यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये उपोषणाला बसणार आहेत. ज्यांना महागावला जाणं शक्य आहे, त्यांनी तिथेही सहभागी होऊन पाठिंबा दर्शवण्याचं आवाहन अमर हबीब यांनी केलं आहे. अमर हबीब यांनी काय आवाहन केलं? “19 मार्च रोजी होणारे उपोषण हे कोणा पक्षाचे नाही. कोणा संघटनेचे नाही. शेतकऱ्याविषयी संवेदना असणाऱ्या प्रत्येकाचे आहे. तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी बसायचे असेल तर जरूर बसा. बसायचे नसेल तर बसू नका. पण त्या दिवशी उपोषण मात्र करा.”, असं जाहीर आवाहन अमर हबीब यांनी महाराष्ट्रातील जनतेला केलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती : अमर हबीब “शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. या आपत्तीच्या वेळेस आपण आपले किरकोळ मतभेद बाजूला ठेवूया. सारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या बाजूने उभा ठाकला तरच मरणाच्या दारावर उभा राहिलेला शेतकरी मागे फिरेल आणि सरकारलाही शेतकरीविरोधी कायदे रद्द करणे भाग पडेल.”, असेही अमर हबीब यांनी सांगितले. शरद जोशींचे सहकारी म्हात्रे सरांचाही सहभाग शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचे अत्यंत निकटवर्तीय व विश्वासू सहकारी प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे हेही या उपोषणात सहभागी होणार आहेत. 19 मार्च रोजी होणाऱ्या उपोषण आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शरद जोशी परदेशातून आल्यानंतर पुण्यातील आंबेठाण येथे शेती करू लागले. पुढे हेच आंबेठाण शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनले. सुरेशचंद्र म्हात्रे हे याच ठिकाणाहून उपोषणात सहभागी होणार आहेत. बाहेर जाण्यास डॉक्टरांनी मनाई केल्याने सुरेशचंद्र म्हात्रे घरी राहूनच उपोषण करणार आहेत. उपोषणाची तारीख 19 मार्च का? साहेबराव शेषराव करपे हे यवतमाळ जिल्ह्यातील चील-गव्हाण या गावचे शेतकरी. त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनीही वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. उदरनिर्वाहाचे साधन शेती. शेती परवडत नाही. दरवर्षी तोटाच होतो. घेतलेली कर्जे फेडता येत नाही, लाईटचे बिल भरता येत नाही, हात उसने घेतलेल्या पैशांची परतफेड करता येत नाही.  म्हणून अस्वस्थ होते. एके दिवशी पत्नी मालती व चार अपत्यांना घेऊन ते पवनार आश्रमात गेले. सविस्तर पत्र लिहिले. रात्री जेवणात विषारी औषध कालवून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. सकाळी त्या एका खोलीतून सहा शव काढावे लागले. साहेबरावांनी लिहून ठेवलेल्या पत्रात त्यांनी शेतकरी म्हणून जगणे कठीण झाले आहे असे नमूद केले होते. ते पत्र समस्त शेतकरी समाजाची दु:खद कैफियत सांगणारे होते. साहेबराव यांच्या आत्महत्येने सारा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या व धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्त्या रोज होतील असा इशारा दिला होता. ही पहिली जाहीर झालेली शेतकऱ्याची आत्महत्या. ती साहेबराव करपे यांनी 19 मार्च 1986 रोजी केली होती. या 19 मार्चला त्यास 31 वर्ष होतात. म्हणून उपवासासाठी 19 मार्च ही तारीख निवडण्यात आली असल्याची माहिती अमर हबीब यांनी दिली. उपोषणाबाबत अमर हबीब यांची भूमिका
गेल्या 31 वर्षापासून अखंडपणे शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या होत आहेत. हा उन्हाळा संपता संपत नाही. शेतकार्यांच्या आत्महत्या ही ‘राष्ट्रीय आपत्ती’ समजून उपाययोजना करायला पाहिजे होती. ना त्या सरकारने केली, ना हे सरकार करीत आहे. सरकार दखल घेत नाही तेंव्हा नागरिक म्हणून आपली जबाबदारी वाढते. आपण काय करू शकतो?, अशी दुर्दैवी घटना आपल्या घरात घडली तर आपण अन्नाचा घास घेऊ शकू का? ‘नाही’ हेच उत्तर असेल तर उपवास करण्याचे पहिले तेच आहे. शेतकऱ्याविषयी सहवेदना जिवंत असल्याची ही साक्ष आहे. आपल्या उपोषणाने काय घडेल, हे मी आज काही सांगू शकत नाही पण एवढे मात्र नक्की की, शेतकरी मारत होते तेंव्हा मी तटस्थपणे पहात राहिलो नाही, मला त्याशी जोडून घेण्यासाठी उपवास केला असे सांगताना सार्थकता वाटेल. मला वाटते, बिंदू-बिदूतून सरिता बनते व तीच पुढे सागराला जाऊन मिळते. कदाचित आपला उपवास ही त्या प्रवासाची सुरुवात ठरेल. ‘एखादी’ व्यक्ती जेंव्हा आत्महत्त्या करते तेंव्हा त्याचे मानसिक कारण असू शकते. पण एकाच व्यावसायातील लाख लाख लोक जेंव्हा आत्महत्त्या करतात, तेंव्हा त्याचे मूळ कारण मानसिकतेत नसते, तर ते सामाजिक व आर्थिक परिस्थितीत शोधले पाहिजे. शेती व्यावसाय तोट्यात ठेवण्यात आला. दारिद्र्य वाढत गेले. पर्यायांचां आभाव राहिला. या सर्व गोष्टींचा विचार केला तर या देशातील शासनकर्त्यांनी जाणीवपूर्वक शेतकरीविरोधी धोरणे राबविली असा निष्कर्ष निघतो. ही धोरणे राबविण्यासाठी त्यांनी काही कायदे निर्माण केले. शेतजमीन धारणा कायदा (सिलिंग), आवाश्यक वस्तूंचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदे हे कायदे अस्त्र म्हणून वापरले. वरील कायदे कायम ठेवून शेतकऱ्यांचे भले करता येत नाही. म्हणून ज्याला शेतक-यांचे भले करायचे आहे त्याने या कायद्यांच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. 19 मार्च रोजी होणारे उपोषण शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणारे आहे म्हणजेच ते शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करणारे आहे.

संबंधित बातमी : शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी एल्गार, 19 मार्चला राज्यव्यापी उपोषण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget