एक्स्प्लोर

'सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू' नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार, नेमकं काय म्हणाले?

Nitesh Ranes Sharp Attack on Uddhav Thackeray: भाजप नेते नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Nitesh Rane Slams Uddhav Thackeray:  'सलमान खान हा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू निघाला', असं म्हणत मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त खास व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या दोन दिवसांत अनेक कलाकार, खेळाडू आणि दिग्गजांनी कार्यक्रमात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे सलमान खानची उपस्थिती लक्षवेधी ठरली. सलमान खानला आरएसएसच्या कार्यक्रमात पाहताच अनेकांनी टीकेची झोड उठवली, तर काहींनी सलमान खानचं कौतुक केलं. या मुद्द्यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर ताशेरे ओढले. 

सभेत पत्रकाराच्या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, "सलमान खान उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त हिंदू आहे.  उद्धव ठाकरेंना खरंच तपासायची गरज आहे, की ते खरंच हिंदू आहेत की नाही.  सलमान खानने सरसंघचालकांच्या कार्यक्रमात किमान उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखली.  उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर, किंवा स्वत:चे वडील बाळासाहेब ठाकरेंना हिंदुहृदयसम्राट बोलण्याची हिंमत दाखवतील का? हे उद्धव ठाकरेंना विचारा", असा घणाघात नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेत, "भाषेबद्दल आग्रही राहणे आणि त्यासाठी  आंदोलने करणे हा एक आजार आहे", असं वक्तव्य केलं होतं.  भागवत यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी यावेळी मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.  "जेव्हा परराज्यातून येणाऱ्या झुंडी स्थानिक संस्कृतीला थेट नाकारतात. भाषेचा सर्रास अपमान करतात.  तेव्हा रोष निर्माण होतो. या गोष्टीला आजार म्हणणे चुकीचे आहे", असं राज ठाकरे म्हणाले. "मुळात स्वत:ला अराजकीय संघटना म्हणवून घेणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत पडायचं कशाला? असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.  

राज ठाकरेंच्या वक्त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंत्री  नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.  "मी स्वत: त्या कार्यक्रमात उपस्थित होतो.  त्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या विषयावर विचार मांडले.  याबाबत ज्यांनी राज ठाकरेंना माहिती दिली, त्यांना चुकीची माहिती देण्यात आली आहे.  मोहन भागवत यांनी आपल्या राष्ट्रीय भाषेवर अभिमान असला पाहिजे.  त्या त्या राज्यातील भाषेचं महत्त्व त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं"

"जिथे जातील तिथे लोकांना कळेल अशा भाषेचा मोहन भागवत यांनी वापर केला. त्यांनी बंगळुरूचं उदाहारण दिलं. तिथे त्यांनी भाषणात इंग्रजी भाषेचा वापर केला. राज ठाकरेंनी ट्विट केलं. पण त्यांनी हे ट्विट कधी मदरसा समाजातील मौलवीला केलेला नाही. अजान मराठीत म्हणा, असं कधी ते म्हणाले नाहीत", असं नितेश राणे म्हणाले.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
IND vs SL 1st Test DAY-2 Live : IND vs SL 1st Test DAY-2 Live : सामना सुरू व्हायला 3 मिनिटे शिल्लक असताना, पुन्हा आला पाऊस अन्.... जाणून घ्या LIVE अपडेट्स
IND vs SL 1st Test DAY-2 Live : सामना सुरू व्हायला 3 मिनिटे शिल्लक असताना, पुन्हा आला पाऊस अन्.... जाणून घ्या LIVE अपडेट्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
Chhatrapati Sambhajinagar: गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना
गाडीला जॅमर लावलं, चालक संतापला; भररस्त्यात चक्क स्वतःचीच कार पेटवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळजनक घटना

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिका वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Embed widget