APMC Market: नवी मुंबईतील (Navi Mumbai) एपीएमसी मार्केटमधील (APMC Market) एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्यापाऱ्यांनी कचऱ्यात फेकून दिलेले आणि खराब झालेल्या कांदे बटाटे त्या ठिकाणचे विक्रेते निवडून घेत आहेत. त्यानंतर त्याची विक्री मॅफको मार्केट येथे रस्त्यावर विक्री करण्यात येते असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाळाच्या दिवसांमध्ये कचऱ्यात टाकून दिलेले कांदे आणि बटाटे तेथेच असलेल्या घाणीच्या पाण्यात धुवून नंतर त्याची विक्री करण्यात येत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकारात एपीएमसी मार्केटचे सुरक्षा रक्षक देखील सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
नागरिकांनी कांदे आणि बटाट्यांची विक्री करताना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु या सगळा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर यावर आता कोणती कारवाई करण्यात येणार का हा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. तसेच एपीएमसी मार्केटचे प्रशासन मार्केटमधील जे सुरक्षा रक्षक यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर देखील काही कारवाई करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले
लांबलेल्या मान्सूनमुळे भाजीपाल्याच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. लांबलेला उन्हाळा आणि पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं चित्र आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, फरसबी, वाटाणा, मिरची आणि कोथिंबीरचे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजीपाला दर. प्रति किलो.
टोमॅटो - 100
सिमला - 100
काकडी- 60
वांगी- 80
दुधी - 80
फरसबी - 160
शेवगा - 120
गवार - 100
गाजर - 80
कोबी- 60
फ्लॉवर- 80
वाटाणा - 150
तोंडली - 90 ते 100
भेंडी- 80 ते 100
मिरची - 160
पालक - 40 प्रतिजुडी
कोथंबीर - 60 प्रतिजुडी
मेथी - 40 प्रतिजुडी
रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याच्या (Vegetables) दरांत मागील काही दिवसांत कमालीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे काही महिन्यांपूर्वी भाजीपाल्याला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून देत आंदोलनं केली होती. मात्र आता भाज्याचे दर कडाडले असून सर्वच भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. दर वाढल्याने शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ पोहचत आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट देखील कोलमडले असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा :
Onion Price: टोमॅटोपाठोपाठ कांदाही सर्वसामान्यांना रडवणार? 'या' कारणानं दर गगनाला भिडण्याची शक्यता