Navi mumbai Latest Marathi News Update: नवी मुंबईतील खाडी किनारी असलेले हजारो मॅंग्रोजची झाडे तोडून त्या ठिकाणी भराव घालण्याचे काम डेब्रिज माफियांचे सुरू आहे. जुईनगर सेक्टर 22 येथील रेल्वे वसाहतीच्या मागील बाजूस असलेल्या मॅग्रोज मोठ्या प्रमाणात डेब्रिज टाकून मॅग्रोजचे जंगल नष्ट केले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजरोसपणे हा प्रकार सुरू असून याकडे महानगर पालिका डेब्रिज विरोध पथक आणि वनविभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे. जवळपास ५ ऐकरावर असलेल्या मॅग्रोजवर बांधकामातून निघणारे डेब्रिज , राडारोडा टाकून भराव केला जात आहे. शहरातील अनेक ठिकाणी अशाच पध्दतीने मॅग्रोज नष्ट करून तिथे भराव टाकला जात असून काही वर्षात तयार होणारे हे प्लॅाट नंतर सिडको विकत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सिडको , महानगरपालिका , वनविभाग आणि डेब्रिज माफियांच्या सगनमतानेच शहरातील मॅग्रोजचे अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात आहे.
जुईनगर येथे रेल्वे वसाहती मध्ये इमारत तोडण्याचे काम सुरू असून या ठिकाणी निघालेले मोठ्या प्रमाणातील डेब्रिज मागील बाजूस असलेल्या मॅग्रोजच्या जंगलात टाकले जात आहे. हे डेब्रिज टाकले जात असताना येथे हिरव्या रंगाची जाळी लावली जात आहे. जेणे करून टाकलेल्या डेब्रिज च्या खाली दबली गेलेली मॅग्रोजची झाडे पटकन लक्षात येवू नयेत. याच पध्दतीचा वापर करीत जवळपास पाच ऐकरावरील हजारो मंग्रोजची झाडे डेब्रिज माफियांनी नष्ट केली आहेत. यासाठी येथील काही गावगुंडांचा या मध्ये सहभाग दिसून येत आहे. विशेष म्हणजे येथे कोळशाचे गोडाऊन उभारली गेली आहेत. या गोडाऊनचा पसारा वाढविण्यासाठी मॅग्रोजची झाडे तोडली जात आहेत. मात्र याकडे वनविभाग , मनपा विभाग यांचे लक्ष नाही का असा सवाल पर्यावरण प्रेमी उपस्थित करीत आहेत.
शहरात अनधिकृत डेब्रिज टाकले जावू नयेत यासाठी महानगर पालिका विभागाने डेब्रिज विरोधी पथकांची स्थापना केली आहे. तर मॅग्रोज झाडांची कत्तल होवू नये म्हणून वनविभागाचे फिरते पथक कार्यरत असते. मात्र जुईनगर येथे ५ ऐकरा पर्यंतचे मॅग्रोज डेब्रिज माफियांनी गिळंकृत करूनही याकडे अर्थ पुर्ण दुर्लक्ष प्रशासनाचे होत असल्याचा संशय आहे.
ही बातमी वाचायला विसरु नका: