Navi Mumbai News: नवी मुंबईत गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत एसएससी सराव परीक्षा 2022-23 चे आयोजन करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा देताना विद्यार्थ्यांवर दडपण असते हे दडपण कही प्रमाणात कमी व्हावे आणि विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा या दृष्टीने या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. 70 शाळांमधील 10 हजार विद्यार्थी या सराव परीक्षेत सहभागी होणार असून 27 परीक्षा केंद्रावर ही सराव परीक्षा होणार आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश, सेमी इंग्लिशचे विद्यार्थी या सराव परीक्षेत सहभाग घेणार आहेत.


बोर्डाच्या धर्तीवर ही परीक्षा घेतली जाते.  विद्यार्थ्यांच्या मनातील दहावीच्या परीक्षेची भीती दूर करून दहावीच्या मुख्य परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढवण्याचा संकल्प या सराव परीक्षेचा आहे. येत्या 3 डिसेंबरपासून सराव परीक्षेला सुरुवात होणार असल्याचे ट्रस्टचे सचिव माजी आमदार संदीप नाईक यांनी सांगितले. या उपक्रमाचे मुख्य समन्वयक अनंत सुतार आणि प्राचार्य प्रताप महाडीक असून परीक्षा होताच त्वरीत निकाल लावला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


दरवर्षी दहा ते पंधरा लाख विद्यार्थी एसएससी बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सामोरे जात असतात. या परीक्षेचे महत्त्व पाहता एक प्रकारचे दडपण आणि भीती बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या मनात असते.‌ त्यामुळे त्यांच्या मनातील ही भीती नाहीशी करून आत्मविश्वास भरण्यासाठी या एसएससी सराव परीक्षेचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 1998 सालापासून या उपक्रमाची नगरसेवक अनंत सुतार यांनी केली होती.  गेली 24 वर्ष नवी मुंबईत दहावी सराव परीक्षा घेतली जात असून याचा फायदा मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना होत आहे. 


या परीक्षेला दरवर्षी सरासरी नऊ ते दहा हजाराच्या दरम्यान विद्यार्थी बसतात. आतापर्यंत दीड लाख विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेऊन मुख्य परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.  यावर्षी 3 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये सराव परीक्षा पार पडणार आहे. नवी मुंबईतील सर्वच विभागातून तब्बल 72 शाळांचा यावर्षी सहभाग असणार आहे.


एसएससी सराव परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेत देखील गुणवत्ता यादीमध्ये झळकतात हा आजवरचा अनुभव आहे.‌ या सराव परीक्षेच्या माध्यमातून मुख्य परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना विषयानुरूप ते कुठे कमी पडत आहेत, उत्तरांमधील उणिवा काय आहेत, या बाबी समजतात. त्यामध्ये विद्यार्थी सुधारणा करतात आणि अधिक आत्मविश्वासाने मुख्य परीक्षेला सामोरे जाऊन यश संपादीत करतात. एसएससी सराव परीक्षेमुळे नवी मुंबईच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची टक्केवारी देखील वाढल्याचे शिक्षक सांगतात.


सराव परीक्षा ॲप


गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने यावर्षी देखील विद्यार्थ्यांना विनामूल्य शैक्षणिक ॲप भेट देण्यात येणार आहे. या ॲपमध्ये हजारो प्रश्नपत्रिका असून त्या प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव विद्यार्थ्यांना करता येईल. याशिवाय व्हिडीओ ट्युटोरियल देखील यात देण्यात आलेलं आहे. अभ्यासाचे नियोजन कसे करावे याविषयी देखील यात मार्गदर्शन करण्यात आले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI