Navi Mumbai Metro: नवी मुंबईत मेट्रो कधी सुरु होणार हा नवी मुंबईकरांच्या (Navi Mumbai news) दृष्टीनं सर्वात मोठा प्रश्न आहे. आता नवी मुंबई मेट्रो सुरु होण्याच्या दिशेनं वेगानं पावलं पडत असल्याचं दिसून येत आहे.  सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे फायनान्शियल क्लोजर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सिडको मेट्रो प्रकल्पाकरता आयसीआयसीआय बॅंक देणार 500 कोटींचा पतपुरवठा करणार आहे. या पतपुरवठ्यामुळं मेट्रोच्या कामांना गती मिळणार असून नियोजित वेळेत कामे पूर्ण होऊन लवकरात लवकर या मार्गावर प्रवासी वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. 


सिडको महामंडळ आणि इंडस्ट्रीअल क्रेडिट ॲन्ड इन्व्हेस्टमेन्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ICICI Bank) बॅंक यांच्यात करार करण्यात आला.  या करारानुसार आयसीआयसीआय बॅंकेकडून सिडको नवी मुंबई मेट्रो मार्गासाठी 500 कोटींचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे मेट्रो प्रकल्पाकरिताची फायनान्शियल क्लोजर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.


संपूर्ण मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणे अपेक्षित


सिडको उभारत असलेल्या मेट्रोचा बेलापूर ते पेंधर हा अकरा किमी लांबीचा आणि 11 स्थानकं असणारा मार्ग आहे. या मार्गावरील व्हायडक्टचे काम पूर्ण झाले असून 11 पैकी 5 स्थानके प्रवासी वाहतुकीकरिता सुसज्ज झाली आहेत. या मार्गाकरिता सीएमआरएससह सर्व महत्त्वाच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित 6 स्थानकांचे काम वेगाने सुरू झाले असून संपूर्ण मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणे अपेक्षित आहे.


नवी मेट्रोसाठी 3 हजार 400 कोटी इतका अंदाजित खर्च


नवी मेट्रोसाठी 3 हजार 400 कोटी इतका खर्च अंदाजित असून त्यापैकी 2600 कोटींचा खर्च सिडकोकडून यापूर्वीच करण्यात आला आहे. उर्वरित खर्च हा आयसीआयसीआय बॅंकेकडून करण्यात येणार आहे. यासाठी 500 कोटींच्या पतपुरवठ्याद्वारे आणि सिडकोच्या अंतर्गत संचित निधितून करण्यात येणार आहे. नवी मुंबई अंतर्गत कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या दृष्टीने मेट्रोचे प्रकल्प महत्त्वाचा असून येथील नागरिकांना प्रवासाचा उत्तम पर्याय देण्यासह बांधकाम क्षेत्राला चालना देण्याकरिता हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावणार आहे.


आयसीआयसीआय बॅंकेकडून करण्यात येणाऱ्या 500 कोटींच्या पतपुरवठ्यामुळे मेट्रोच्या कामांना गती मिळणार असून नियोजित वेळेत कामे पूर्ण होऊन लवकरात लवकर या मार्गावर प्रवासी वाहतूक करता येणे शक्य होणार आहे. आयसीआयसीआय बॅंकेकडून मंजूर करण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे एकप्रकारे सिडकोच्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेवर मोहोर उमटविण्यात आली  असल्याचे सिडको एम डी डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितलं आहे.


ही बातमी देखील वाचा