एक्स्प्लोर
'काँग्रेसनं नाशिकमध्ये प्रचारासाठी कार्यकर्त्यांना पैसे देऊन आणलं'

नाशिक: काँग्रेसनं नाशिकमध्ये पैसे देऊन प्रचारासाठी कार्यकर्त्यांना आणल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडं रॅलीच्या पैशातच सभा करण्याचा आग्रह स्थानिक काँग्रेस नेत्यांनी धरल्याने सभेचा फज्जा उडाल्याची चर्चा रंगली आहे.
आज नाशिकमधील वडाळा गावात सह्याद्री हॉस्पिटलसमोर दुपारी 2.30 वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचार सभा आयोजित केली होती. या प्राचार सभेसाठी महिलांना 150 ते 200 रुपये देतो असे सांगून महिलांना आणलं होतं.
मात्र प्रचाराला येऊनही आयोजकांनी पैसे देण्यास नकार दिल्यानं अनेक महिलांनी या सभेतून काढता पाय घेतला. माध्यमांशी बोलताना, सभेसाठी 150 ते 200 रुपये देतो असे सांगितलं होतं. पण आयोजकांनी आपला शब्द फिरवल्याचा आरोप या महिलांनी केला आहे. तसेच प्रचारासाठी सकाळपासून उपाशी-तपाशी फिरवतात असाही आरोप महिलांनी केला आहे.
तर दुसरीकडं रॅलीच्या पैशातच प्रचार सभा करण्याचा आग्रह स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरल्याने सभेचा फज्जा उडाल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे.
संबंधित बातम्या: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या प्रचारसभेकडे नाशिककरांची पाठ!
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
ठाणे
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















