एक्स्प्लोर

सूर्यग्रहण काळात पाणी न सोडण्याचा निर्णय त्र्यंबक नगरपरिषदेच्या अंगलट?

आज दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण होतं. या काळात देशभरातील अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरपरिषदेने सूर्यग्रहण काळात पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय आता वादात सापडण्याची शक्यता आहे.

नाशिक : सूर्यग्रहण काळात पाणी न सोडण्याचा निर्णय त्र्यंबक नगरपरिषदेच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सूर्यग्रहण काळात शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. ग्रहणकाळ संपल्यानंतर शहराला पाणी पुरवठा करण्यात आला. मात्र, यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. नगरपरिषद अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा आरोप केलाय, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मधील नागरिक पालिकेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. देशभरातुन भाविक त्र्यंबक नगरीत पूजा पाठ करण्यासाठी दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी हा निर्णय प्रत्येक ग्रहण काळात घेतला जातो, त्यात वावगं काही नसल्याचं नागरिकांच म्हणणं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. हेही वाचा - आज दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण, क्रिकेट सामन्यांच्या वेळेत बदल, शिर्डीसह अनेक मंदिरंही ग्रहणकाळात बंद राहणार आज दशकातलं शेवटचं सूर्यग्रहण - चालू वर्षातलं आणि या दशकातलं(2010 ते 2019)शेवटचं सूर्यग्रहण आज पाहायला मिळाले. हे सूर्यग्रहण भारतात कंकणाकृती असून कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील काही भागातून दिसले. खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला 'फायर रिंग' असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. हेही वाचा - ...म्हणून पंतप्रधान मोदी सूर्यग्रहण पाहू शकले नाहीत शिर्डीतील साई मंदिर तीन तास बंद - ग्रहण असल्यामुळे शिर्डीतील साई मंदिर आज तीन तासांसाठी बंद ठेवण्यात आले. कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत साईंचं समाधी मंदिर बंद होतं. या काळात समाधी मंदिरात मंत्रोच्चार बंद होता. साईमंदिराप्रमाणे देशभरात आज अनेक मंदिरं ग्रहणवेळेत बंद ठेवण्यात आली. या ग्रहणामुळे आज होणारे रणजी ट्रॉफीमधील सामन्यांच्या वेळतही बदल करण्यात आला. हेही वाचा - क्रिकेटलाही 'सूर्यग्रहण', सामने उशिरा सुरु होणार; बीसीसीआयची माहिती Solar Eclipse | देशभरात कंकणाकृती सूर्यग्रहण, मुंबईसह महाराष्ट्रात तीन तास ग्रहण | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Embed widget