Nashik Toll Plaza : रस्त्याचं काम पूर्ण न करता टोलवसुली करणं टोल कंपनीला महागात पडलं आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्याला तब्बल सव्वा दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. टोल रद्द करुन कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करण्याची मागणीही होत आहे. 


गेल्या बऱ्याच काळापासून ही टोलवसुली सुरु होती. वारंवार तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष होत होतं. अखेर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे तक्रार केली. राष्ट्रीय प्राधिकरणानं याची तात्काळ दखल घेत टोल नाक्यावर कारवाई केली. याप्रकरणी टोलनाक्याला कोट्यवधींचा भुर्दंड पडला आहे. 


रस्त्याचं काम पूर्ण न करता सर्रास टोलवसुली करणं नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलनाक्याला महागात पडलं आहे. याप्रकरणी तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. अर्धवट रस्त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि अपघाताचे प्रमाणही वाढले. उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या नागरिक व्यावसायिकांना त्रास होतो. याबाबत वारंवार विनंती, सूचना करुनही रस्त्याचं काम पूर्ण होत नव्हते. अखेर शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे तक्रार केली. यानंतर टोलवसुली करणाऱ्या चेतक प्रा. लिमिटेड कंपनीला 2 कोटी 18 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या ठिकाणी अपघातांमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्यानं कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. तसेच रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करण्याची मागणीही केली जात आहे. 


नाशिक मुंबई महामार्गावर असणाऱ्या खड्या बाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेकांनी आवाज उठविल्यानं रस्ता तत्काळ दुरुस्त करण्यात आला. मात्र या मार्गावरून नेत्यांचा प्रवास तुलनेनं कमी असल्यानं सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, दंडात्मक कारवाईनंतर तरी टोल वसुली थांबणार का? रस्ता दुरुस्त होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :