एक्स्प्लोर

राजीनामा घेण्याची गरज नव्हती, अजून तपास सुरुय : संजय राऊत

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आरोप होत असलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एका मुलाखतीदरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबई : आम्ही लोकांचा, विरोधकांचा आवाज एकतो. राजीनामा घेण्याची गरज नव्हती कारण अजून तपास सुरु आहे. संजय राठोड जूना कार्यकर्ता आहे. विरोधी पक्षाचा जय झाला असे अजिबात समजू नये. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथेही असे प्रकार घडले. त्या मुलीची आत्महत्या की हत्या हे दुर्दैव आहे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथील मुलाखतीत मांडली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. त्यावर ते बोलत होते.

राऊत म्हणाले, की याच काळात मुंबईत देलकरानी आत्महत्या केली. त्यांनी गुजरातला पण केली असती पण त्यांना वाटल असेल की तिथे न्याय मिळणार नाही. म्हणून मुंबईत केली असावी. देलकर यांनी आत्महत्या केली. त्या सुसाईड नोटमध्ये भाजप संबंधित नेत्यांची नावे असून आम्ही त्यांना न्याय देऊ, असेही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कायम स्वरूपी राहणार आहे. एकही आमदार जाणार नाही आणि हे सगळ्यांना माहित असल्याचे राऊत म्हणाले.

राजभवनाचे अधःपतन सुरुय : संजय राऊत राजभवनाचे अधःपतन सुरु असून हे सगळे दिल्लीचे एजंट असतात, त्या पदावर असणाऱ्यांना त्याची किंमत कळायला हवी. राज्यपाल कोश्यारी संघाचे प्रचारक होते, मंत्री होते, खासदार होते, ते वडीलधारी आहेत. कोश्यारी आजोबांसारखे बसलेले असतात. त्यांच्या विचारांच सरकार हवे म्हणून पहाटे त्यांनी शपथ दिली. राजपथची धडपड आहे की त्यांच्या विचारांच सरकांर यावं. पण, या देशाला राज्यपालाची नाही राष्ट्रपताची गरज आहे, पांढऱ्या हत्तीची गरज नसल्याचा टोलाही राऊत यांनी राज्यपालांना लगावला. लोकशाही मार्गाने आलेल्या सरकारसोबत ते असहकार करतायेत, असं असेल तर राज्यपाल पदाची गरज काय? 12 आमदारांची यादी राज्यपाल खाली घेऊन बसलेत, असेही ते म्हणाले.

भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की न्यायाने वागणं ही आमची जबाबदारी आहे. दोषी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे हीच या सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. एखाद्याला आयुष्यातून उठवायचंच आहे म्हणून काम केलं जातंय. आम्ही म्हणतो तसाच तपास झाला पाहिजे असं म्हटलं जातंय. मात्र, तसं होणार नाही. संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की तुम्ही सोबत असाल तर प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसते आरोप करणं म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात असल्याचे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget