Shiv Sena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, संजय राऊतांचे निकटवर्तीय शिंदे गटात
Shiv Sena : संजय राऊत यांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय भाऊ चौधरी (Bhau Chaudhary) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय.
मुंबई : शिवसेना ठाकरे ( Shiv Sena ) गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. संजय राऊत यांचे (Sanjay Raut) निकटवर्तीय भाऊ चौधरी (Bhau Chaudhary) हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातोय. आज रात्री साडे नऊ वाजता नागपूर येथे भाऊ चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश होणार आहे.
संजय राऊत यांच्या कायम सावली सारखे बरोबर राहणारे म्हणून भाऊ चौधरी यांना ओळखले जाते. भाऊ चौधरी हे नाशिकचा कारभार सांभाळत होते. संजय राऊत तुरुंगात जाताना आणि तुरुंगातून बाहेर येताना देखील भाऊ चौधरी त्यांच्या बरोबर होते. परंतु, आता ते शिंदे गटाचा प्रवेश करणार आहेत.
Shiv Sena : शिवसेनेकडून हाकलपट्टी
दरम्यान, भाऊ चौधरी हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर त्यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय. "शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची शिवसेना तसेच संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात येत आहे.शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे@OfficeofUT
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 21, 2022
Shiv Sena : सुहास कांदेंचा संजय राऊतांना टोला
भाऊ चौधरी यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून शिंदे गटाचे नेते सुहास कांदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावलाय. "मैत्री वेगळी आणि राजकीय भविष्य वेगळे असतं. त्यामुळे भाऊ चौधरींना वाटलं असेल की ठाकरे गटापेक्षा शिंदेंसोबत भविष्य उज्वल असेल. भाऊंना काढून टाका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे, असं ट्वीट मध्ये उल्लेख आहे. संजय राऊतांना विश्वासात घेतलं असेल की नाही माहीत नाही. पण राजकीय भविष्य उज्ज्वल असेल असं सांगितलं असेल असा टोमणा कांदे यांनी लगावलाय.
महत्वाच्या बातम्या
Shiv Sena : शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का! आणखी एका नेत्याचा शिवसेनेला जय महाराष्ट्र