नाशिक :  नाशिकच्या पानेवाडी प्रकल्पातील इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढा, असे आदेश   महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांनी दिले आहेत. कायदा कुणी हातात घेणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील विखे पाटलांनी दिल्या आहेत. संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा आहे, असे विखे पाटील म्हणाले.  ते नाशिकमध्ये बोलत होते. हिट अँड रन कायद्याविरोधात (Hit and Run New Rule)  ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे.


  विखे पाटील म्हणाले, हिट अॅन्ड रन कायद्याविषयी  थोडा समज गैरसमज आहे. अनेक ठिकाणी संप मागे घेतले आहेत. स्थिती तशीच राहिली तर गंभीर आहे. येणाऱ्या बातम्यांमुळे लोक तणावात होत आहेत. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेतय. संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा आहे. 


महायुतीचा फॉर्म्युला मोदी साहेबांच्या उपस्थितीत ठरणार : विखे पाटील


महायुतीचा फॉर्म्युला मोदी साहेबांच्या उपस्थितीत ठरणार आहे. एकनाथ शिंदे किंवा अजित दादा यांनी मोदींचे नेतृत्त्व स्वीकारले आहे. इंडिया आघाडीत बिघाडी आहे. राज्यात आणि देशात गेलेली सत्ता कशी मिळवायची एवढीच त्यांना चिंता आहे, असे  विखे पाटील म्हणाले 


चर्चेला जरांगेनी यायला हवं चर्चेतून मार्ग निघतो : विखे पाटील


मनोज जरांगेच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले, आंदोलनाचा अधिकार प्रत्येकाला आहे.  अनेक राज्यात आंदोलन झालं आहेत. चर्चेला त्यांनी यायला हवं चर्चेतून मार्ग निघतो. 


काँग्रेसला नेतृत्व कुठे? विखे पाटलांचा सवाल


काँग्रेसमधील काही नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहे. या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले,  काँग्रेसमधील अनेक लोकांची इकडे येण्याची इच्छा आहे. काँग्रेसला नेतृत्व कुठे आहे. वाटाघाटी करायला फक्त नेते येत आहेत. वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याचीच चर्चा आहे.


वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश


वाहतूकदारांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत . कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  संपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती केंद्राला दिली जाणार आहे. 


 



 


हे ही वाचा :