नाशिक: चांदवड येथे चांदवड-मनमाड राज्य महामार्गावर अवैधरित्या स्फोटके घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला आहे. जिलेटिनच्या कांड्यांची (Gelatin) वाहतूक करणारा एक ट्रक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असल्याची पोलिसांना (Nashik Police) माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या ट्रकमधून एकूण 7 लाख 94 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. 


चांदवड येथील एका पेट्रोल पंपवर डिझेल भरण्यासाठी आलेला ट्रक पोलिसांनी हस्तगत केला. एका ट्रकमध्ये जिलेटिनच्या कांड्या असून तो ट्रक छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांना डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर हा ट्रक आढळून आल्याने पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर ट्रकमध्ये जिलेटीनचे स्फोटके आढळून आल्याने हा ट्रक ताब्यात घेतला.


या ट्रकमधून एकूण 7 लाख 94 हजारांचा स्फोटकांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संदर्भात चांदवड येथे बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले असून हे स्फोटके कुठे घेऊन जाणार होते, याचा उपयोग कशासाठी होणार होता याबाबत पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत. 


दारूसाठी पैसे पाहिजेत म्हणून आईची हत्या 


लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच आपल्या आईच्या डोक्यात लोखंडी मुसळ घालून तिचा निर्दयीपणे हत्या केली आहे. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिला होता, त्यामुळेच या दारूड्या मुलाने आईचा जीव घेतला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संगीता नाथराव मुंडे (वय 40 वर्ष रा. सताळा, ता. अहमदपूर) असे मारहाणीत मयत झालेल्या आईचे नाव असून, ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23 वर्ष) असे आरोपी मुलाचे नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानेश्वर याचे माध्यमिक शिक्षण अर्धवटच झाले आहे. सध्या तो शेतीत काम करतो. दरम्यानच्या काळात मित्रांच्या संगतीने तो दारुच्या आहारी गेला. गावातील नदीच्या बाजूला असलेल्या शेतात त्यांचे घर आहे. आई-वडील आणि ज्ञानेश्वर तिघेही याच ठिकाणी राहतात. तर, ज्ञानेश्वरचा छोटा भाऊ कृष्णा हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. 


दरम्यान, शुक्रवारी ज्ञानेश्वरचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यामुळे, शेतातील घरात आई संगीता व मुलगा ज्ञानेश्वर हे दोघेच होते. दारुची सवय जडलेल्या ज्ञानेश्वर याला दारू पिण्याची इच्छा झाली. नुकतीच म्हैस विकल्याने घरात आईकडे पैसे असतील, असा अंदाज काढून दारू पिण्यासाठी ज्ञानेश्वर याने आईकडे पैशाची मागणी केली. तेव्हा 'माझ्याकडे पैसे नाहीत' म्हणताच घरात ठेवलेल्या डब्यातील डाळ व इतर जीवनोपयोगी साहित्य तो विक्रीसाठी घेऊन जात होता. घरातील किराणा साहित्य घेऊन जाण्यास आईने त्याला विरोध किला. तेव्हा रागाच्या भरात उखळात कुटण्यासाठी वापरण्याची लोखंडी मुसळ त्याने आईच्या डोक्यात मारून तिला गंभीर जखमी केले. नंतर तिचे निधन झाले.


ही बातमी वाचा :