एक्स्प्लोर

राज्यात लवकरच 60-70 हजार पदांसाठी टप्प्याटप्प्याने भरती : अजित पवार

फडणवीस सरकारने मेगाभरती करण्याचं आश्वासन दिलं पण ती रखडली. अखेर आता महाराष्ट्र विकास आघाडी मेगाभरती करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

नाशिक : महाराष्ट्र विकास आघाडी सरकार लवकरच 60 ते 70 हजार रिक्त पदांसाठी टप्प्याटप्प्याने मेगाभरती करणार आहे. सुरुवातील पोलीस दलातील आठ हजार पदं भरणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील कादवा इंग्लिश मीडियम शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण, ग्रामविकास, गृह, जलसंपदा, जलसंधारण, नगरविकास, कृषी, पशु व संवर्धन आणि आरोग्य विभागात अनेक पदं रिक्त आहेत. फडणवीस सरकारने मेगाभरती करण्याचं आश्वासन दिलं पण ती रखडली. अखेर आता महाराष्ट्र विकास आघाडी मेगाभरती करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. सरकारच्या या निर्णयामुळे बेरोजगार तरुणांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील तरुणांना सरकारचं न्यू ईयर गिफ्ट, हजारो पदांसाठी भरती 60-70 हजार पदांची टप्प्याटप्प्याने भरती विविध विभागांमधील मेगाभरतीविषयी अजित पवार यांनी सांगितलं की, "आम्ही सरकारमधील बऱ्याचशा जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदा आठ हजार पोलिसांची भरती घेतोय. ती भरती झाल्यानंतर वेगवेगळ्या विभागांमध्ये जी काही कमतरता आहे, मग ती शिक्षक, कृषीसेवक, ग्रामसेवक, किंवा परिचारिकांची असो, त्याचा आम्ही आढावा घेतोय. जवळपास 60-70 हजार पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्याचं काम या सरकारला करावं लागणार आहे. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे." फडणवीस यांच्यासोबतच्या शपथविधीची आठवण याच कार्यक्रमात बोलताना अजित पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या ऐतिहासिक शपथविधीची आठवण झाली. ते म्हणाले की, "माझ्यामुळे आपल्याला सकाळी लवकर उठून यावं लागलं, त्यासाठी माफ करा. परंतु सकाळी दहा वाजल्यापासून नाशिक, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबारमध्ये माझ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आहेत. त्यामुळे मला हीच वेळ देता येणं शक्य होतं. मला आमदारसाहेब बोलत होते, काही जण चर्चा करत होते, इतक्या लवकर येतील का? तर दुसरा बोलला की अरे येतील, ते सकाळी उठूनच शपथविधी करतात. गंमतीचा भाग जाऊ द्या."

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
आंदोलकांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार नाही, अटकेतील विद्यार्थ्यांची तातडीने सुटका; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आदेश जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget