एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई
![नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई Record Break Printing Of Notes Worth Rs Five Hundred In Nashik Security Press नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये युद्धपातळीवर नोटांची छपाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/11/24175219/Nashik_Press_Note-580x3951.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नव्या नोटांची छपाई सुरु आहे. गुरुवारी एकाच दिवसात पाचशेच्या तब्बल साडे सतरा दशलक्ष नोटा छापून बेलापूरला रवाना करण्यात आल्या. सलग 5 रविवार सुट्टी न घेता छपाई सुरु असल्याची माहिती आहे.
पाचशेसोबतच शंभर रुपयांच्या अडीच दशलक्ष नोटाही गुरुवारच्या एका दिवसात छापण्यात आल्या. विशेष म्हणजे कालबाह्य आणि देखभालीची आवश्यकता असलेल्या मशिन्सच्या मदतीनं ही छपाई करण्यात आली.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात चलनाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. तेव्हापासून नाशिक प्रेसमध्ये आतापर्यंत 300 दशलक्ष नोटांची छपाई करण्यात आली. आणखी 3 महिने युद्धपातळीवर नोटा छपाईचं काम सुरु राहणार आहे.
नाशिकच्या सिक्युरीटी प्रेसमधून गेल्या महिन्यात 2 कोटी 45 लाख नोटा हवाई मार्गाने पाठवण्यात आल्या. केरळ, चंदीगड आणि चेन्नईला या नोटा पुरवल्या गेल्याची माहिती मजदूर युनियन सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी दिली होती.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)