नाशिक : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने 'प्रपोज डे'च्या दिवशीच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आलीय. शहरातील इंदिरानगर परिसरात राजसारथी सोसायटीमध्ये राहणारा अजय थोरात हा 25 वर्षीय तरुण आपल्या मित्रासमवेत भाडेतत्वावर राहत होता.

Continues below advertisement


8 जानेवारीला संध्याकाळी अजयचा मित्र घरी आला असता अनेक वेळा दार ठोठावूनही अजय दार उघडत नसल्याने त्याने स्थानिक रहिवासी तसेच पोलिसांना याठिकाणी पाचारण केले. पोलिसांनी शिडीच्या सहाय्याने वर चढत खिडकीतून आत डोकावून पाहिले असता सिलिंग फॅनला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत अजयचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास केला असता अजयचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते, त्या मुलीसोबत लग्न करण्याची त्याची ईच्छा होती. मात्र, तिने लग्नास नकार दिल्याने अजय काही दिवसांपासून नैराश्यात होता आणि याच कारणामुळे त्याने आपली जीवनयात्रा संपवल्याच प्राथमिक तपासात समोर आलं आहे.


आधी फेसबुकवरुन मैत्री नंतर व्हॉट्सअपवर अश्लिल व्हिडीओ चॅट.. अन् त्यानंतर ब्लॅकमेलचा फोन


कुटुंबासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय
इंदिरानगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. अजय मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचा असून कामानिमित्त तो नाशिकमध्ये वास्तव्यास होता. अजयने बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले असून एका खाजगी कंपनीत तो नोकरीला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, दोन भाऊ असा परिवार असून अजयच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबासह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आयुष्यात कुठलेही नैराश्य आले किंवा अडचणी भेडसावल्यास कुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत चर्चा करून मार्ग काढा मात्र असे टोकाचे पाऊल उचलू नका असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येतंय.