एक्स्प्लोर

35 तोळे सोन्याची चोरी, एका वर्षाने तक्रार, 12 तासात चोर गजाआड

मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित कुटुंबातील प्रतिभा चांडक यांचं 35 तोळं सोनं आणि 15 किलो चांदी साधारण एक वर्षांपूर्वी चोरीला गेलं होतं. प्रतिष्ठेपायी चांडक यांनी वर्षभर पोलिसात तक्रार केली नाही. मात्र 9 नोव्हेंबरला त्यांनी मुंबई नाका पोलिसात चोरीची तक्रार केली.

नाशिक : एक वर्षापूर्वी चोरीला गेलेलं 35 तोळे सोनं आणि 15 किलो चांदी हस्तगत करण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे. मात्र इतकी मोठी चोरी होऊनही फिर्यादीने एक वर्ष तक्रार का दाखल केली नाही आणि एरव्ही वर्षानुवर्षे मुद्देमाल न मिळणाऱ्या नाशिक पोलिसांना तक्रार दाखल झाल्यावर अवघ्या 12 तासात मुद्देमालासह चोर मिळून आल्याने ही कारवाई वेगळ्याच चर्चेचा विषय ठरली आहे. मुंबई नाका परिसरात राहणाऱ्या प्रतिष्ठित कुटुंबातील प्रतिभा चांडक यांचं 35 तोळं सोनं आणि 15 किलो चांदी साधारण एक वर्षांपूर्वी चोरीला गेलं होतं. प्रतिष्ठेपायी चांडक यांनी वर्षभर पोलिसात तक्रार केली नाही. मात्र 9 नोव्हेंबरला त्यांनी मुंबई नाका पोलिसात चोरीची तक्रार केली. एका वर्षाने दाखल झालेल्या या तक्रारीची तत्परतेने दखल नाशिक पोलिसांनी संशयावरुन खासगी कार चालक नितीन यादव वालझाडेला सटाणा तालुक्यातील ठेंगोडा येथून अटक केलं. नितीनकडून एक वर्षांपूर्वी चोरीला गेलेला मुद्देमालही हस्तगत केला हे विशेष. नितीन हा उच्चशिक्षित युवक आहे. आता हे सगळं इतकं जलद घडल्याने या तपास आणि चोरीबद्दलच अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं आताच तक्रार का दाखल झाली. पोलिसांनी अचूक चोर कसा शोधला आणि एक वर्षाने तक्रार येऊनही 12 तासात मुद्देमाल मिळवून देणाऱ्या नाशिक पोलिसांचं कौतुक करावं की ते  सर्वसामान्यांना असा न्याय का मिळवून देत नाही म्हणून दोष द्यावा असा प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: तुम्ही पाप करताय म्हणणारा अशोक खरात कोठडीत रडतोय; पहिल्या आठवड्यात आत्मविश्वास दाखवला पण आता फासे उलटे पडताच...
तुम्ही पाप करताय म्हणणारा अशोक खरात कोठडीत रडतोय; पहिल्या आठवड्यात आत्मविश्वास दाखवला पण आता फासे उलटे पडताच...
Ashok Kharat : अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार; जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापकाची कबुली, सगळंच सांगितलं!
Ashok Kharat: एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटलं; अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती
एका तरुण मुलीचा मृत्यू, तिच्या कुटुंबियांना भीती दाखवून लुटलं; अशोक खरातने उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरच्या जमिनीबाबत धक्कादायक माहिती
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट
भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा; रुपाली चाकणकरांच्या बहिण अन् पुतण्याच्या नावे बनावट अकाऊँट

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget