तुकाराम मुंढेच्या 17 समर्थकांना अटक
तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी नाशिक महापालिकेसमोर सकाळी आंदोलन केलं होतं. नाशिक महापालिकेसमोर मुंढेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत भाजप आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला.

नाशिक : नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात नाशिककर रस्त्यावर उतरले होते. मात्र मुंढे यांच्या बदलीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या मुंढे समर्थकांचं आंदोलन पोलिसांनी दडपण्याचं प्रयत्न केला.
तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या 17 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांनंतर त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे. परवानगी न घेता आंदोलन करणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी नाशिक महापालिकेसमोर सकाळी आंदोलन केलं होतं. नाशिक महापालिकेसमोर मुंढेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत भाजप आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. सर्वसामान्य नाशिककरांनी एकवटत मुंढेंच्या बदलीविरोधात नारे दिले.
तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली झाली आहे. मुंबईतील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली केल्याचं पत्र मुंढेंना देण्यात आलं. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार सोपवून नियुक्तीच्या ठिकाणी जाण्याचे निर्देश तुकाराम मुंढेंना देण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधी आणि मुंढे यांच्यातील टोकाच्या संघर्षानंतर मुंढेंची उचलबांगडी झाल्याची चर्चा आहे. नाशिकचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुकाराम मुंढेंकडे महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी सोपवली होती.
तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षात 12 बदल्या
महापालिका आयुक्त, सोलापूर (2006-07)
प्रकल्प अधिकारी, धारणी (2007)
उपजिल्हाधिकारी, नांदेड (2008)
सीईओ, नागपूर जिल्हा परिषद (2008) अतिरिक्त आदिवासी आयुक्त, नाशिक (2009) के. व्ही. आय. सी. मुंबई (2010)
जिल्हाधिकारी, जालना (2011)
जिल्हाधिकारी, सोलापूर (2011-12)
विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई (2012)
आयुक्त, नवी मुंबई महापालिका (2016)
पीएमपीएमएल, पुणे (2017)
नाशिक महापालिका आयुक्त (2018)
मुंबई नियोजन विभाग सहसचिव (नोव्हेंबर 2018)























