एक्स्प्लोर
नाशकात गोळ्या झाडून मित्राची हत्या, 5 महिन्यांतील 23 वी घटना
![नाशकात गोळ्या झाडून मित्राची हत्या, 5 महिन्यांतील 23 वी घटना Nashik Youth Murdered By Firing Bullets नाशकात गोळ्या झाडून मित्राची हत्या, 5 महिन्यांतील 23 वी घटना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/24081515/Nashik-Murder-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : हत्येच्या घटनेने नाशिक पुन्हा एकदा हादरलं आहे. सातपूर कॉलनीमध्ये संदीप चव्हाण या युवकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री 11 वाजता शहरातल्या सातपूर कॉलनीत जिजामाता मैदानजवळ संदीप चव्हाण या 29 वर्षीय युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संदीपच्या मित्रांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. आरोपी आणि मृत संदीप दोघांनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये हत्येच्या घटना वाढल्यामुळे शहरात घबराट पसरली आहे. गेल्या पाच महिन्यातील ही हत्येची 23 वी घटना असून, गेल्या चार दिवसांमधली ही तिसरी हत्या आहे. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पोलिस अयशस्वी ठरत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
करमणूक
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)