नाशिक: ग्रामीण जिल्हा पोलिस भरतीची (Nashik Police Bharti) मैदानी चाचणी (Physical Test) संपली असून 164 पोलिस शिपाई आणि 15 पोलिस शिपाई चालकपदाच्या भरतीसाठी राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत सुमारे 2 हजार 60 उमेदवार पडताळणीत अपात्र ठरले आहेत.


नाशिक जिल्ह्यात ग्रामीण पोलिस दलातील 179 पदांसाठी मैदानी चाचणी 2 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये घेण्यात आली. यामध्ये 21 हजार 49 उमेदवारांच्या भरती प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते. त्यातील 14 हजार 326 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी दिली. यातील 12 हजार 266 उमेदवार शारीरिक मोजमापे आणि कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरले असून त्यांच्या मैदानी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.


नाशिक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी 21 लाख 49 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. यात पुरुष उमेदवार 18 हजार 935 महिला 2 हजार 114 आणि तृतीयपंथी तीन उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 14 हजार 326 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी दिली. पोलिस भरतीसाठी अर्ज केलेल्या 21 लाख 49 हजार उमेदवारांपैकी 14 हजार 326 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी दिली. त्यातील 12 हजार 266 उमेदवार शारीरिक मोजमापे व कागदपत्रे पडताळणीत पात्र ठरली.


नाशिक पोलिस भरती प्रक्रियेत 14 हजार 326 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी दिली. त्यातील सुमारे 2 हजार 60 उमेदवारांना छाती, उंचीच्या शारीरिक मोजमापांसह कागदपत्रांमधून त्रुटींनी अपात्र ठरविले.


Nashik Police Recruitment: सहा हजाराहून अधिक उमेदवार गैरहजर...


नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या 21 हजार 49 उमेदवारांपैकी 14 हजार 326 उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून मैदानी चाचणी दिली. तर सुमारे 6 हजार 723 उमेदवार या भरती प्रक्रियेत गैरहजर राहिले.


उमेदवारांना मिळालेले गुण त्याच दिवशी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून उमेदवारांना काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षात तक्रार घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी संकेतस्थळावर माहिती बरोबर असल्याची खात्री करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.


ही बातमी वाचा: