Maharashtra Police Recruitment: राज्यभरात सध्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु आहे. नांदेडनंतर रायगडमध्ये (Nanded Raigad Police Bharti News) देखील भरतीसाठी आलेल्या उमेदवाराने उत्तेजक औषध घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील 185 पोलीस शिपाई पदासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. 2 जानेवारीपासून पोलीस मैदानावर 185 पोलीस शिपाई पदासाठी कागदपत्र तपासणी आणि छाननी झाल्यानंतर आता मैदानी चाचणी सुरू आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान शनिवारी एका उमेदवाराजवळ उत्तेजित करणारे मसल बूस्टर अमली औषध आणि सिरींज आढळून आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या उमेदवाराला वजिराबाद पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली आहे. त्याच्या अहवालाची आता पोलिस प्रतीक्षा करीत आहेत. या अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.त्यामुळे नांदेड पोलिसांनी खबरदारी घेत मैदानावर येणाऱ्या उमेदवारांची आता कसून तपासणी सुरू केली आहे.


पालघरमध्येही एका उमेदवाराला अपात्र केलं...


दरम्यान शनिवारी पालघर येथील एका उमेदवाराची संशयावरून पोलिसांनी झाडाझडती घेतल्या नंतर त्याच्याकडे ऑक्सिबूस्टर हे शक्तीवर्धक औषध आणि रिकामे सिरींज आढळून आले. त्याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर त्याच्यावर पुढील कारवाई होणार आहे. परंतु पोलीस भरतीसाठी प्रक्रियेसाठी मात्र त्याला अपात्र करण्यात आले आहे.


मैदानावर चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची कसून तपासणी


सध्या शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येत आहे. राज्यात काही ठिकाणी अग्निवीरच्या भरतीत उमेदवारांनी शक्तीवर्धक औषधी घेतल्याचे उदाहरण ताजे आहे. त्यामुळे पोलिस भरतीत असे गैरप्रकार टाळण्यासाठी सतर्कतेचे आवाहन नांदेड पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मैदानावर चाचणीसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची आता कसून तपासणी करण्यात येत आहे. 


गैरप्रकार रोखण्याची पोलिसांकडे यंत्रणाच नाही


नांदेड आणि रायगड जिल्ह्यात अशा घटना उघड झाल्यात. पण असे गैरप्रकार रोखण्याची पोलिसांकडे यंत्रणाच सध्या नाही. यामुळे पहाटे उठून सराव करणाऱ्या मुलांवर अन्याय तर होत नाही ना असा संशय येऊ लागला आहे.  नांदेड पाठोपाठ रायगड जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या तिघांकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या सापडल्या. तिघा तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी दोन तरुण पुणे जिल्ह्यातील तर एक जण अहमदनगरचा आहे. 


रायगड जिल्ह्यात 272 जागांसाठी 3 जानेवारीपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. रायगड पोलिसांना खबऱ्याकडून वरसोली आणि नाईक अळी या ठिकाणच्या कॉटेजमध्ये असलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य आणि गोळ्या असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या ज्या तरुणांच्या रक्ताच्या सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 


ही बातमी देखील वाचा


Raigad Police Recruitment : पोलीस भरतीसाठी आलेल्या तीन उमेदवारांकडे आढळली उत्तेजक द्रव्ये, रायगडमधील धक्कादायक घटना