Nashik Rain : नाशिक- मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ, गंगापूर धरणातून सहा हजार क्यूसेक्सनं गोदापात्रात विसर्ग सुरू
Nashik Rain : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Nashik Rain : सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या (Nashik Rain) गोदावरी नदीच्या (Godavari River) पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिर, रामसेतू पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर धरणातून सहा हजार क्यूसेक्स वेगाने गोदापात्रात विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात होणार वाढ
करण्याच येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. शिवाय जिल्ह्यातील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी येऊन पोहोचले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पावसाने हजेरी लावल्याने सकाळपासून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुपारनंतर 6 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी गोदापात्रात सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास विसर्गात वाढ होणार आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी (Maharashtra Rain Update)
बुधुवारी सर्वत्र गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले. गणपतीच्या आगमनामुळं सर्वत्र उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. दरम्यान, आज देखील पावासाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसानं नंदूरबार जिल्ह्यात हजेरी लावली आहे. गेल्या 15 दिवसापासून तिथे पाऊस झाला नव्हती. शेतकरी पावसाची वाट बघत होते. अखेर तिथे चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी समाधानी आहेत. तसेच वर्धा शहरासह ग्रामीण भागांमध्ये जोरदार पाऊस बरसला आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.