एक्स्प्लोर

विश्वास नांगरे पाटील अॅक्शनमध्ये, गुंडांच्या मुसक्या आवळण्यासाठी 'आय अँड इयर' उपक्रम

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिस सज्ज झाले असून पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आता अॅक्शनमध्ये आले आहेत. आयुक्तपदाचा कारभार स्वीकारताच गुंडाच्या मुसक्या आवळायला त्यांनी सुरुवात केली आहे. यासाठी ते दरोरज नवनवीन उपक्रम ते राबवत आहेत, ज्याचं नाशिककरही स्वागतच करत आहेत.

नाशिक : टोळीने फिरणारे गुंड तुम्ही आजपर्यंत बघितले असतील मात्र टोळीने फिरणारे पोलिस तुम्ही कधी बघितले आहेत? नाशिक शहरातील रस्त्यांवर सध्या असंच चित्र बघायला मिळत आहे. पोलिस आयुक्तपदाचा कारभार स्वीकारताच विश्वास नांगरे पाटलांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गुंडाच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली आहे. त्यासाठी नवनवीन उपक्रम त्यांच्याकडून राबवले जात आहेत. आठवडाभरापासून 'आय अँड इयर' हा नवीन उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. तुमच्या परिसरातील नागरिकांना आपला पोलिस निरीक्षक कोण ते कळावा, यासोबतच परिसरातील टवाळखोरांवर वचक बसावा, म्हणून शहरातील सर्वच 13 पोलिस ठाण्याच्या पोलिसांना सकाळी 10 ते 12 तसेच संध्याकाळी 5 ते 7 या काळात त्यांच्या हद्दीत पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक नागरिक पोलिसांचे कान आणि डोळे बनावे, असा 'आय अँड इयर' या उपक्रमामागील उद्देश असल्याचं विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं. पायी पेट्रोलिंग करत पोलिसांकडून टवाळखोरांवर तर कारवाई केलीच जात आहे. सोबतच महिला आणि व्यापारीवर्गाला सतर्कतेचे आवाहनही केलं जातं. पोलिसांच्या या उपक्रमाचं नागरिकांकडूनही स्वागत केलं जात असून ही कारवाई तात्पुरती न ठेवता कायमस्वरुपी चालू ठेवावी, अशी मागणीही ते करत आहेत. महिलांची छेडछाड, चोऱ्या, घरफोड्या या नाशिकमध्ये जणू रोजच्याच झाल्या आहेत. विश्वास नांगरे पाटील यांनी चार्ज घेताच 18 दिवसात जवळपास 500 हून अधिक टवाळखोरांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. 112 गुंडांची तडीपारीची यादी त्यांनी तयार केली आहे. यासोबतच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. एकंदरीतच काय तर निवडणुकीसाठी आता नाशिक पोलिस सज्ज झाले असून ते चांगलेच अॅक्शनमध्ये आले आहेत. फक्त 'नव्याचे नऊ दिवस' ही म्हण खरी ठरु नये हीच नाशिककरांची अपेक्षा..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Embed widget