एक्स्प्लोर

पितृपक्षात पितरांच्या मोक्षासाठी जखमी कावळ्याचा 'बाजार'

नाशिककरांच्या पितरांना मोक्ष देण्याचं पुण्य कमवताना, मांज्यानं जखमी झालेला कावळ्याच्या मालकानं खिसा देखील भरल्याची चर्चा आहे.

नाशिक : सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे सगळ्यांनाच पितरांची आठवण झाली आहे. या जगाचा निरोप घेतलेल्या पितरांना मोक्ष मिळावा म्हणून सगळेच कावळ्यांचा धावा करत आहेत. कारण कावळा शिवल्याशिवाय पितरांना मोक्ष मिळत नाही, अशी लोकांची भावना आहे. मात्र लोकांच्या याच भावनेचं भांडवल करत नाशिकमध्ये एका अवलियानं जखमी कावळ्याचा बाजार मांडला आहे. पितरांच्या नैवेद्याला काकस्पर्श व्हावा, म्हणून नाशिककरांची सुरु असलेली धडपड पाहून कुणालाही हसू येईल. रेशन दुकानावर रॉकेल आल्यानंतरही झुंबड उडत नसेल, तशी गर्दी या कावळ्यासाठी होते. कावळ्यानं चोच मारल्याशिवाय पितरांना मोक्ष मिळत नाही, असं म्हणतात. नाशिककरांच्या पितरांना मोक्ष देण्याचं पुण्य कमवताना, मांज्यानं जखमी झालेला कावळ्याच्या मालकानं खिसा देखील भरल्याची चर्चा आहे. पितृपक्ष सुरु असल्यामुळे कावळ्याला किती डिमांड आहे, हे रामकुंडावर फेरफटका मारल्यावर पाहायला मिळतं. लोक अक्षरशः ताटकळत उभे राहिलेले दिसतात. एखाद्या समारंभाची पंगत जेवू शकेल एवढा नैवेद्य काकस्पर्शाच्या प्रतीक्षेत आहे. फक्त पितृपक्षालाच कावळ्याची आठवण काढणारे आपण, त्यांच्या घटत्या संख्येबद्दल अजिबात विचार करायला तयार नाही. पिंडाला कावळा शिवल्यानं दिवंगत पूर्वजांना मोक्ष मिळतो हा श्रद्धेचा भाग झाला. मात्र कावळ्यांप्रमाणे इतर पक्ष्यांच्या मुळावर घाला घालणारे आपणच आहोत हे विसरुन चालणार नाही. जर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी वेळीच पाऊल उचललं नाही, तर पितरांच्या पिंडाला शिवणारा कावळा फक्त अंकलिपीच्या चित्रातच बघायला मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या

फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त

तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास!

मनोज जरांगेंची पाडण्याची क्षमता सिद्ध झाली, आता...; निवडणुकीवरुन प्रवीण दरेकरांचे पाटलांना चॅलेंज

Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
Embed widget