एक्स्प्लोर

Nashik : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावर, शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार

एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलेल आहे. त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उद्या होणार आहे. 

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नाशिक दौऱ्यावर असून दुपारपर्यंत शहरातील विविध कार्यक्रमात ते हजेरी लावणार आहेत. यात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे शिंदे गटाच्या नाशिकच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. 

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा नाशिकला भेट दिली असून काही दिवसांपूर्वी ते नाशिकच्या स्वामी नारायण मंदिराच्या उदघाटनासाठी आले होते. त्यांनतर आज पुन्हा ते नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

दरम्यान, नाशिकमध्ये शिंदे गटाचे पहिलेवहिले संपर्क कार्यालय उभारण्यात आले असून त्याच्या उद्घाटनासाठीचा महत्वाचा कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटाच्या आगामी पायाभरणीसाठी हे महत्वाचे केंद्र असणार आहे. काही दिवसांनी नाशिक महापालिका निवडणूका रंगणार आहेत. त्यादृष्टीने देखील तयारीचा श्रीगणेशा हे कार्यालय ठरण्याची शक्यता आहे. तर अलीकडेच अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे समजते. यांचा प्रवेश सोहळा या निमित्ताने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठाकरे गटासह इतर कोणते पदाधिकारी शिंदे गटाची वाट चोखळतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संपर्क कार्यालयाचे उदघाटन 

शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन पक्षाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत. एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर (Mumbai) नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक कार्यालय हे भव्य असं कार्यालय आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या जवळ खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच उभ करण्यात आलेल आहे. विशेष याच रस्त्यावर शालिमार परीसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे. 

नाशिक शहरात विविध कार्यक्रम 
 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री शिंदे यांचं ओझर येथील विमानतळावर आगमन होईल. 10.30 वाजता नाशिकरोड येथील सारथी केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते होणार असून, पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ तसेच नाशिक येथील गंजमाल येथील बाळासाहेबांची शिवसेना कार्यालयाचे उदघाटन तसेच कालिदास कालामंदिर येथे एका स्थानिक वृत्त वहिनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे आदी सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Embed widget