एक्स्प्लोर

आ. बच्चू कडूंनी नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवरच हात उगारला!

आमदार बच्चू कडू आणि समर्थकांनी नाशिक महापालिकेत बराच गोंधळ घातला. अपंग पुनर्वसन कायदयाची अंमलबजावणी करत नसल्यानं बच्चू कडूंनी थेट आयुक्तांवरच हात उगारला.

नाशिक: आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांनी नाशिक महापालिकेत जोरदार गोंधळ घातल्याचं समोर आलं आहे. अपंग पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी झाली नसल्या कारणानं आयुक्त अभिषेक कृष्ण यांना घेराव घालण्यात आला होता. त्याचवेळी बाचाबाची झाल्यानं बच्चू कडू यांनी आयुक्तांवरच थेट हात उगारला. नाशिक महापालिकेनं 1995 अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून प्रहार संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट शिवीगाळ करत कृष्ण यांच्या अंगावर धावत जात हात उगारला. पण शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना वेळीच रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. शरणपूर रोडवरील महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जोरदार घोषणाबाजीमुळे परिसरात सध्या तणाव आहे. दरम्यान, याप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त हरिभाऊ फडोळ यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत

Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम

सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी

Embed widget