एक्स्प्लोर
राज ठाकरेंचं नवनिर्माण पाहण्यासाठी मराठी कलावंतांचा नाशिक दौरा
![राज ठाकरेंचं नवनिर्माण पाहण्यासाठी मराठी कलावंतांचा नाशिक दौरा Marathi Celebrities Visited To Nashik Development Project राज ठाकरेंचं नवनिर्माण पाहण्यासाठी मराठी कलावंतांचा नाशिक दौरा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/17200137/NASHIK-CELEBRITY.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या मनसेनं केलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी नाशिक दौरा केला. यावेळी देशातील सगळ्यात मोठं चिल्ड्रन पार्क, वनौषधी उद्यान, स्व.बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाला या कलाकारांनी भेटी दिल्या.
त्यानंतर संध्याकाळी बोटॅनिकल गार्डन, होळकर पुलावरील वॉटर कर्टनलाही हे कलाकार भेट देतील. यावेळी राज ठाकरे त्यांच्या सोबत असणार आहेत.
नाशकातील मनसेनं केलेली विकासकामं पाहण्यासाठी आलेल्या कलाकारांमध्ये महेश मांजरेकर, संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, सिध्दार्थ जाधव, सायली संजय यांच्यासह 20 कलाकारांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
सोलापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)