एक्स्प्लोर
सप्तश्रुंगी गडावरुन उडी, विवाहितेची चिमुरडीसह आत्महत्या
नाशकातील निफाड तालुक्यात शिरवाडे वणीमध्ये राहणारी कांचन निफाडे आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह बेपत्ता होती.

मनमाड : सप्तश्रुंगी गडाजवळ दरीमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरडीसह एका विवाहितेचा मृतदेह आढळला आहे. गडाच्या शीतकड्यावरुन महिलेने लेकीसह उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सप्तश्रुंगी गडावरुन दरीचे फोटो काढणाऱ्या भाविकांना या दोघींचे मृतदेह दिसले. त्यानंतर पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. नाशकातील निफाड तालुक्यात शिरवाडे वणीमध्ये राहणारी कांचन निफाडे आपल्या अडीच वर्षांच्या मुलीसह मंगळवापासून बेपत्ता होती. मायलेकीचा शोध सुरु असतानाच भातोडे शिवारात त्यांचे मृतदेह आढळल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कांचनने शीतकड्यावरुन उडी घेतली असावी, असा अंदाज पोलिस वर्तवत असले तरी दोघींच्या मृत्यूमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
आणखी वाचा























