एक्स्प्लोर

मालेगावमधील अपघातात मृतांचा आकडा 25, तर 33 जण जखमी; मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत जाहीर

नाशिकच्या मालेगाव तालुक्यात एसटी बस-ऑटो रिक्षा यांच्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 33 जण जखमी झाले आहेत

नाशिक : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात झालेल्या बस आणि रिक्षा अपघातातील मृतांचा आकडा 25 वर गेला आहे तर 33 जण जखमी आहेत. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. अपघातातील जखमींवर सध्या मालेगावातील जिल्हा रुग्णालयासह इतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाखांची मदत सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. तर रिक्षामधील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जास्तीत जास्त आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन मंत्री छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

मालेगाव-देवळा रोडवरील मेशी फाट्यावर धोबी घाट परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर एसटी बस आणि रिक्षा दोन्ही वाहनं थेट विहिरीत कोसळली होती. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. या अपघातात बस आणि रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.

पाहा व्हिडीओ : एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात, वाहनं विहिरीत कोसळली

सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केलं. काही वेळात पोलीस आणि बचाव पथकही तेथे दाखल झालं. मात्र दोन्ही वाहनं विहिरीत कोसळल्याने बचावकार्यात अनेक अडथळे येत होते. त्यानंतर बसची मागची काच फोडून 33 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची टीम यांनी स्थानिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. जखमींवर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात आणि देवळाच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बस धुळ्यावरून कळवणच्या दिशेने जात होती. तर रिक्षा मालेगावच्या दिशेने जात होती. बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्याने, बस थेट समोरुन येणाऱ्या रिक्षाला धडकली. मात्र बसचा वेग जास्त असल्याने रस्त्यापासून 20 ते 25 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत दोन्ही वाहनं कोसळली. बसमध्ये चालक, वाहकासह 46 प्रवासी होते. तर रिक्षात 9 प्रवासी होते. या अपघातात बस चालकाचाही मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

पाहा व्हिडीओ : मालेगाव-देवळा मार्गावर एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 25 जणांचा मृत्यू

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अपघातानंतर शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने योग्य ती वैद्यकीय मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र त्यांना आवश्यक तो सर्व औषधोपचार देण्याचेही त्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितलं आहे. जखमींवर देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी व 9 डॉक्टरांची टीम यावर लक्ष ठेवून आहेत.

संबंधित बातम्या : 

मालेगावमध्ये एसटी बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 20 जणांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget