एक्स्प्लोर

नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला, अज्ञातांकडून कृत्य  

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नाशिक दौऱ्यामध्ये त्यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.  नाशिकमधील येवल्यात ही घटना घडली आहे. 

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रथमच नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मालेगाव  तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे शिंदे गटात सामील झालेल्या दादा भुसे, सुहास कांदे यांच्या पाठबळासाठी हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. अशातच येवला तालुक्यातील विंचूर चौफुलीवर शिंदे समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालेगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून वैजापूर येथे जाणार आहेत. त्याआधी ते येवला येथे समर्थकांच्या गाठीभेटी घेण्यासाठी काही काळ थांबणार आहेत. या पार्श्वभूमीवर येवल्यातील  शिंदे समर्थकांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर विंचूर चौफुली व फत्तेबुरुज नाका भागात लावले होते. मात्र दौऱ्याच्या एक दिवस आधीच कोणीतरी बॅनर  फाडल्यामुळे येवल्यातील वातावरण तापले होते. 

याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तत्काळ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन बॅनर उतरवून घेण्यात आले. या प्रकरणी बॅनर फाडणाऱ्या अज्ञातांवर कारवाईची मागणी शिंदे समर्थकांनी शहर पोलिसांकडे केली आहे. याबाबत समर्थकानी एकत्र येवून येवला शहर पोलिसांना लेखी निवेदन दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. परंतु, या दौऱ्यादरम्यानच हे कृत्य केल्यामुळे नाशिकमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

असा असेल मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा

29 जुलै रोजी सोईनुसार मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण आणि मालेगाव येथे मुक्काम. शनिवार 30 जुलै रोजी मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकासकामांबाबत आढावा बैठक होईल. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री औरंगाबादकडे रवाना होणार असून तेथे त्यांचा मुक्काम असणार आहे.
 
महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime News: घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घरा शेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याच्या केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Laughter Chefs 3 Winner: हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
हसवत-खेळत मारली बाजी! अली गोनी-जन्नत जुबैर ठरले 'लाफ्टर शेफ्स 3'चे महाविजेते; 'बिट्टू-बिट्टी'च्या जोडीनं जिंकली ट्रॉफी
NCP Bhagyashree Dhaygude Allegations Against Mangesh Jagtap Baramati: लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक; राष्ट्रवादीच्या तरुणीचा मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, बारामतीमध्ये काय घडलं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Embed widget