अभयारण्यात जाण्यापेक्षा कसारा घाटात या... भर रस्त्यात बिबट्याचं दर्शन!
बिबट्या रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सतत येणाऱ्या वाहनांमुळे आणि वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशामुळे तो थोडासा गोंधळल्याचं दिसत होता.

नाशिक : कसारा घाटात मुक्तसंचार करणारा बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कसारा घाटात रस्त्यावर फिरणाऱ्या बिबट्याचं वाहनचालकांनं मोबाईल फोनमध्ये चित्रिकरण केलं आहे.
बिबट्या रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र सतत येणाऱ्या वाहनांमुळे आणि वाहनांच्या हेडलाईनच्या प्रकाशामुळे तो थोडासा गोंधळल्याचं दिसत होता. वाहनचालकांनी मोठ्याने हॉर्न वाजवून बिबट्याला रस्त्याच्या बाजूला हटवण्याच्या प्रयत्न केला, मात्र बिबट्या बराच वेळ रस्त्याच्या मधोमध फिरत होता.
मोठी अवजड वाहनं वेगाने या रस्त्यावरुन जात असल्याने काही वेळ बिबट्याच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गारवा आणि पाण्याच्या शोधात बिबटे मानवी वस्तीकडे जास्त प्रमाणावर येत आहेत. मात्र बिबट्याच्या अशा मुक्तसंचारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Before You Go
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या





















