एक्स्प्लोर

बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या नागरिकांमुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात

नाशिक शहराची कोरोनामुक्त होण्याकडे सुरू असलेली वाटचाल शहरात एकाच दिवशी सहा रुग्ण सापडल्याने थांबली आहे. दरम्यान, बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या नागरिकांमुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला शहरातील पहिला गोविंदनगर परिसरातील रुग्णही बरा होऊन घरी गेल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शहर लवकरच कोरोनामुक्त होईल असं दिसून येत असतानाच शनिवारी अचानक शहरात सहा नवे रुग्ण मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. बेकायदेशीररित्या घुसखोरी केलेल्या नागरिकांमुळे नाशिककरांचे आरोग्य धोक्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. कारण हॉटस्पॉट असलेल्या मालेगावसह इतर जिल्ह्यातून शहरात दाखल झालेले नागरिक कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असतानाच दुसरीकडे नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे नाशिककरांसोबत पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून समाधान व्यक्त केलं जात होत. दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेला शहरातील पहिला गोविंदनगर परिसरातील रुग्णही बरा होऊन घरी गेल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शहर लवकरच कोरोनामुक्त होईल असं दिसून येत असतानाच शनिवारी अचानक शहरात सहा नवे रुग्ण मिळून आल्याने खळबळ उडाली. सिडको, सातपूर, हिरावाडी, पाथर्डी फाटा, देवळाली या परिसरातील ते रहिवासी आहेत. यात एका लष्करी जवानासह एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून जिल्हा रुग्णालयातील एका सरकारी डॉक्तरलाही कोरोनाची लागण झाली आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी

बाहेरुन आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण

धक्कादायक म्हणजे सिडको, सातपूर आणि हिरावाडी परिसरातील तीन रुग्ण हे कोरोना बाधित क्षेत्रातून नाशिकमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. सिडको परिसरातील व्यक्ती हा जळगावच्या भडगावहून दुधाच्या टँकरने छुप्या पद्धतीने शहरात आला असून हिरावाडी परिसरातील पोलीस कर्मचारी आणि सातपूर परिसरातील महिला ही मालेगावहून नाशकात दाखल झाली आहे. सातपूर कॉलनीतिल 60 वर्षीय महिला नातेवाईकांसोबत कारने हॉटस्पॉट मालेगावहून नाशिकला परतलीय तर सिडकोतिल 39 वर्षीय पुरुष हा जळगावच्या भडगावहून दुधाच्या टँकरमधून छुप्या पद्धतीन नाशिकमध्ये दाखल झालाय. या दोन्ही रुग्णाच्या संपर्कांतील 28 नागरिकांना सध्या क्वॉरंटाईन केले गेले आहे. त्यांचे अहवालही चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शहरात आतापर्यंत 16 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 9 जण कोरोनाबाधित क्षेत्रातून आले असल्याने त्यांना बाधा झाली आहे आणि ही बाब नक्कीच गंभीर आहे.

CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील

लॉकडाउनमुळे जिल्हा बंदी करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांच्या हद्दीवर पोलिसांकडून नाकाबंदी केली जात आहे. मात्र, तरी देखिल नागरिक शहरात दाखल होत असल्याने पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाशिक शहराला मालेगावचा सर्वाधिक धोका असून या ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध करणे गरजेच आहे. नाहीतर अशाप्रकारे बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांमुळे संसर्ग वाढत गेला तर नाशिकचे मालेगाव होण्यास वेळ लागणार नाही हे नक्की.

Coronavirus | एक हजार खाटांचं रुग्णालय मुंबईच्या बीकेसीत उभारण्याचं काम सुरु

महत्त्वाच्या बातम्या

Monsoon Update : भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
भरमसाठ कोसळल्यानंतर राज्यावर मान्सून पुन्हा रुसला, अरबी समुद्र अन् उत्तर भारतात कमी दाबाचा पट्टा; ढगांची दाटी विरळ, राज्यावर पुन्हा नवं संकट? वाचा सविस्तर
Maharashtra Heavy Rain: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पाऊस थांबला, पाणी ओसरल्याने विरारच्या लोकल ट्रेन सुरु, नाशिकमध्येही धोका टळला
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल, 6 जागांवर बिनविरोध विजयी; छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह उर्वरित 11 जागांचा आज फैसला
विधान परिषदेच्या निवडणुकीचा आज निकाल, 6 जागांवर बिनविरोध विजयी; छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह उर्वरित 11 जागांचा आज फैसला
Vidhan Parishad Election 2026: भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल
भाजपच्या गोकूळ गीतेंना विरोधकांचा पाठिंबा, शिवसेनेचं टेन्शन वाढलं; महायुतीतील बंडखोरी शमविण्यासाठी मंत्री उदय सामंत तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget