एक्स्प्लोर
नाशिकमध्ये पोलिसाची गुंडगिरी, तरुणाला काठी तुटेपर्यंत बेदम मारहाण

नाशिक : रस्ता ओलांडणाऱ्या वैभव क्षीरसागर नावाच्या तरुणाला नाशिकमधील पोलिसाने बेदम मारहाण केली. यात वैभवच्या पायाला दुखापत झाली असून, त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
घटना काय आहे?
वैभव क्षीरसागर नामक एक तरुण आज संध्याकाळी (बुधवार) बीवायके कॉलेजमधून बाहेर येऊन रस्ता ओलांडत होता. त्यावेळी कॉलेज समोरील विद्यार्थ्यांची गर्दी हुसकण्याच्या नादात एका बिट मार्शल पोलिसाने वैभवच्या पायावर विनाकारण काठी मारली.
काठी का मारली, असे वैभवने पोलिसाला विचारले. त्यानंतर कारण विचारल्याचा राग आल्याने त्या पोलिसाने रस्त्याच्या बाजूला नेऊन काठे तुटेपर्यंत बेदम मारहाण केली, असा आरोप वैभवने केला आहे.
दरम्यान, वैभवच्या पायाला दुखापत झाली असून, सध्या नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गंगापूर पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आलि आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
