एक्स्प्लोर

बदलत्या हवामानाचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फटका; टोमॅटो, द्राक्ष पीक संकटात

बदलत्या हवामानामुळे नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो, द्राक्ष या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ शकतो.

नाशिक : बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसू लागलाय. सकाळी धुकं आणि त्यानंतर ढगाळ हवामान असल्यान टोमॅटो, द्राक्ष अशा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी हातातलं पीक जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे कांद्यानंतर यावेळी टोमॅटोलाही चांगला भाव मिळत होता. मात्र, आता रोगांमुळे हे पीक हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील महिन्यात टोमॅटोचे भाव तेजीत होते. कांद्यापाठोपाठ टोमॅटोही भाव खात होता. मात्र, आता हाच टोमॅटो आता जणावर खाऊ लागले आहेत. 60/70 रुपये किलो दराने मिळणारा टोमॅटो 2/3 रुपये किलोपर्यंत खाली घसरला आहे. नाशिक जिल्ह्यात गिरणारे गावात टोमॅटोची मोठी बाजारपेठ आहे. कोट्यवधींची उलाढाल होणाऱ्या बाजारातून देशातच नाही तर परदेशातही टोमॅटो जात असतो. मात्र, आज हवामानाच्या बदलामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. परतीच्या पावसाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यापुढे पुन्हा अस्मानी संकट येऊन उभं आहे. लाखो रुपये खर्च करुन वाढवलेलं पीक हातातून जाण्याची वेळ शेतकऱ्यावर आलीय. गेल्या आठदहा दिवसापूर्वी थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली. त्यामुळे कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, अचानक ढगाळ हवामान आल्यानं त्याचा फटका पिकांना बसू लागलाय. पहाटे दाट धुकं, त्यानंतर ढगाळ हवामान असल्यान शेती पिकांवर रोग पडायला सुरुवात झालीयं. पान जळून गेली असून पिकांची वाढही खुंटली आहे. हेही वाचा - शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचे एकनाथ खडसेंकडून स्वागत! जी स्थिती टोमॅटोची तीच द्राक्ष बागांची होत आहे. सुर्यप्रकाश मिळत नसल्यानं करपा डवण्यां रोग पडायला सुरुवात झालीयं. मनी गळत असून पानही करपू लागली आहेत. लाखो रुपये खर्च केलेली बाग आता डोळ्यांदेखत उध्वस्त होत असल्यान कर्जमाफीपेक्षा वीज बिल माफ करावे, खत औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी शेतकरी करू लागला आहे. पुढचा एक दोन महिना शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थाने कमाईचा राहणार होता. मात्र, निसर्गापुढे शेतकरी हवालदील आहे. सरकारकडून मदत मिळत नसल्यानं अस्मानी आणि सुलतानी संकटाना तोंड देता देता नाशिकचा शेतकरी हवालदील झालाय. त्यातच पुन्हा पाऊस पडला तर शेतकरी उध्वस्त होण्याची भीती व्यक्त होतेय. कांद्याचा भाव उतरला - तब्बल 100 रुपये किलोपर्यंत गेलेल्या कांद्याचा भाव आता उतरला आहे. बाजारात आवाक वाढल्याने कांद्याचा भाव किलोमागे 50 ते 60 रुपये झाला आहे. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने कांद्याच्या दरात सारखा चढउतार सुरू आहे. दरम्यान, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचा भाव गेल्या मागील आठवड्यापासून हळूहळू खाली येऊ लागला आहे. हेही वाचा - शेतकरी कर्जमाफी, 10 रुपयांत शिवभोजन, मुख्यमंत्र्यांकडून शेवटच्या दिवशी घोषणांचा पाऊस Eknath Khadse on Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाचं एकनाथ खडसेंकडून स्वागत | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
Embed widget