एक्स्प्लोर

Nashik Weather Update : नाशिककर गारठले! यंदाच्या निचांकी तापमानाची नोंद; नाशिक, निफाडची आकडेवारी काय?

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढला आहे. नाशिकला यंदाच्या निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नाशिककर गारठले आहे.

Nashik Weather Update नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कमालीचा गारठा वाढला आहे. मंगळवारी नाशिकमध्ये (Nashik News) निचांकी तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरात  9.8 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर सोमवारी 29.3 कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. 

मकर संक्रांतीपासून (Makar Sankranti 2024) दिवस वाढतो आणि तीळ तीळ थंडी कमी होते, असे म्हटले जाते. मात्र, यंदा उलट चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकमधील किमान तापमानात अचानक घट झाली आहे. मंगळवारी पारा 9.8 अंशांवर जाऊन पोहोचला आहे. थंडीमुळे (Cold) नाशिककर चांगलेच गारठले आहेत. 

दोन ते तीन दिवस थंडी कायम

दोन दिवसांपूर्वी रविवारी किमान तापमान 15.4 होते ते मंगळवारी 9.8 अंश सेल्सिअस वर जाणून पोहोचले आहे. उत्तरेकडील शीत लहरींचा परिणाम सध्या दिसून येत आहे. आणखी दोन ते तीन दिवस थंडी कायम राहण्याचा  अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. 

निफाड @7.4

निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) कुंदेवाडी कृषी संशोधन केंद्रात मंगळवारी 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी निफाडला निचांकी तापमान नोंदवले गेले.  दरम्यान, निफाड तालुक्यात 25 डिसेंबरला 8.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर काही अंशी उकाडा पुन्हा वाढला होता. आता सोमवारी (दि. 15) म्हणजेच 21 दिवसांनी वर्षभरातील सर्वात कमी तापमानाची नोंद निफाडला करण्यात आली.  

अनेकांनी पेटवल्या शेकोट्या

थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिक, शेतकरी, ऊसतोड कामगारांनी शेकोट्या पेटविल्या होत्या. थंडीमुळे रस्त्यांवर सकाळी वर्दळ कमी दिसून आली. तसेच नागरिकांनी उबदार कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळाले. कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी फायद्याची ठरणार आहे. मात्र वाढत्या थंडीने द्राक्ष बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

काही ठिकाणी पावसाची शक्यता

मंगळवारपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशावर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे मंगळवारी (दि. 14) आणि बुधवारी (दि. 15) जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगळ्या ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 14 जानेवारी 2024 पासून केरळ-माहे, दक्षिण आतील कर्नाटक, तामिळनाडू-पुडुचेरी-कराईकल, रायलसीमा आणि किनारी आंध्र प्रदेश आणि यानामच्या लगतच्या भागात ईशान्य मोसमी पाऊस थांबला आहे. मंगळवारी देशाच्या दक्षिणेसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

National Youth Festival : २८ राज्यातील खाद्यपदार्थांसोबत नाशिकच्या मिसळने वाढवली लज्जत; स्टॉल्सवर नागरिकांची झुंबड

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या विद्यार्थिनीशी मराठीत मारल्या गप्पा; म्हणाले, "तुला तर सलाम ठोकावा लागेल"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget