एक्स्प्लोर

Trimbakeshwar Temple Closed : मोठी बातमी! त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील दोन महिने दर्शनासाठी बंद राहणार; 'या' तारखेपासून भाविकांना प्रवेश बंद

Trimbakeshwar Temple Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या पार्श्वभूमीवर आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पुढील दोन महिने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar Temple) मंदिरातून भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात विकासकामे आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर पुढील दोन महिने भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

संभाव्य नियोजनानुसार येत्या 15 किंवा 16 ऑक्टोबरपासून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाला दिलेल्या सूचनांनुसार हा निर्णय घेण्यात येत आहे.

Trimbakeshwar Temple Rules : मंदिरातील नित्यपूजा सुरूच राहणार

मंदिर जरी भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार असले, तरी मंदिरातील पारंपरिक आणि धार्मिक परंपरा खंडित होणार नाहीत. श्री त्र्यंबकेश्वराची दररोज होणारी नित्यपूजा, त्रिकाल पूजा आणि धार्मिक विधी नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू राहतील.

त्र्यंबकेश्वर मंदिरात रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. कुंभमेळ्याच्या कामांमुळे अपघात किंवा चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवू नये म्हणून गर्दी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्टकडून मंदिर बंद करण्याबाबतच्या तारखांची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे.

Trimbakeshwar Temple VIP Darshan Closed : 12 ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद

दरम्यान, सध्या पितृपक्षाच्या निमित्ताने देशभरातून हजारो भाविक त्र्यंबकेश्वर येथे पितृकर्म आणि धार्मिक विधींसाठी येत आहेत. शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने 12 ऑक्टोबरपर्यंत सर्व प्रकारचे व्हीआयपी (VIP) दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ केंद्र, राज्य शासन किंवा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या राज्यशिष्टाचाराच्या (Protocol) पत्रांनाच यातून अपवाद ठेवण्यात आले आहे.

Trimbakeshwar Development Work : कुंभमेळ्याच्या विकासकामांना वेग

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर शहर तसेच मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा आणि रस्ते विस्तारीकरणाची कामे प्रस्तावित आहेत. मंदिर दोन महिने बंद राहिल्याने प्रशासनाला कुंभमेळ्याची विकासकामे कोणत्याही अडथळ्याविना वेगाने पूर्ण करता येणार आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
नाशिकमध्ये अमृत भारत एक्स्प्रेसच्या डब्यात कारवाई, 1 कोटी 48 लाखांच्या रोकडसह संशयित व्यक्ती ताब्यात
Kumbh Mela 2026 : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात भूकंपाचा विशेष अभ्यास सुरू! चार यंत्रांद्वारे सलग तीन महिने 24 तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात भूकंपाचा विशेष अभ्यास सुरू! चार यंत्रांद्वारे सलग तीन महिने 24 तास भूगर्भातील हालचालींवर लक्ष
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
दिवाळीसाठी पाहुण्यांकडे आले, ह्रदयद्रावक दुर्घटना; वडिलांसह दोन मुलींचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू
Advertisement

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Advertisement
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget