एक्स्प्लोर

Truck Driver Strike : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील संपाची परिस्थिती काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Nashik Truck Driver Strike News : नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या कायद्याविरोधात संप पुकारला आहे. या संपात सुमारे 1 हजार 500 टँकरचालक उतरले आहेत.

Nashik Truck Driver Strike News : नाशिक जिल्ह्यातील इंधन कंपन्यांच्या वाहतूकदार संघटनांनी सरकारने अपघाताबाबत बनवलेल्या कायद्याविरोधात सोमवारपासून संप (Fuel Gas Transporters in Nashik) पुकारला आहे. या संपात सुमारे 1 हजार 500 टँकरचालक उतरले आहेत. यामुळे उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) व मराठवाड्यातील (Marathwada) १२ जिल्ह्यांतील इंधन पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र आहे. 

सरकारने अपघाताबाबत केलेल्या कायद्यामध्ये १० वर्षांची शिक्षा आणि सात लाख दंडाची तरतूद  आहे. हे कायदे अन्यायकारक असल्याची तक्रार चालकांनी केली असून या विरोधात सोमवारी सकाळपासून सर्वच टँकर चालक संपात उतरले आहेत.सकाळपासून चालकांनी एकही टँकर भरलेला नाही. त्यामुळे नाशिक, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे व नंदुरबार आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील दैनंदिन इंधन पुरवठा झाला नाही. उत्तर महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती काय? जाणून घ्या

नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप ड्राय होण्यास सुरुवात

नाशिकच्या मनमाडजवळील नागापूर व पानेवाडी इंधन प्रकल्पातून होणारी इंधनाची वाहतूक बंद असल्याने उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भातील पाच -सहा जिल्ह्यांना होणारा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे.नाशिक जिल्ह्यातील पेट्रोल पंप ड्राय होण्यास सुरुवात झाली आहे. काल संपावर दोन बैठका झाल्या मात्र निष्फळ ठरल्या. त्यामुळे आजही संप सुरूच आहे. 

धुळ्यात नागरिकांची मोठी गैरसोय

धुळे शहरात सकाळपासूनच पेट्रोल पंपावर मोठी गर्दी दिसून येत आहे. केंद्र सरकारने मोटर कायद्यामध्ये त्वरित बदल करून वाहक व चालकांच्या मागण्या पूर्ण करून संप मिटवण्याचा प्रयत्न करावा जेणेकरुन पेट्रोलमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही याची देखील केंद्र सरकारने काळजी घ्यावी अशी प्रतिक्रिया यावेळी धुळे शहरातील पेट्रोल पंपचालक शशांक महाले यांनी दिली. पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांना दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

जळगावात संपाचा बाजार समितीवर परिणाम 

पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत रांगा लावल्याचे पाहायला मिळाले. काही तासातच लाखो लिटर पेट्रोल डिझेल विकले गेले. अनेक पंपावर पेट्रोल साठा संपल्याने अनेकांना खाली हात परत जावे लागले. ज्या पेट्रोल पंपावर काही प्रमाणात पेट्रोल शिल्लक आहे ते आज दुपारपर्यंत  विकले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागरिकांना पेट्रोल मिळण्यात अडचण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंदच्या आवाहनाचा बाजार समितीवर तुरळक परिणाम दिसून आला आहे. उद्या आवक कमी प्रमाणात होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल पंपवर मोठी गर्दी

केंद्र सरकारनं मोटर अपघात कायद्यात बदल करून त्यात सुधारणा केली आहे. या विरोधात देशभरातील वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या कारणावरून देशभरातील वाहतूकदार आणि चालकांनी संप पुकारला आहे. त्यात पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारे सहभागी झाले आहेत. हे आंदोलन किती दिवस चालणार? हे निश्चित नाही, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होणार नाही, यामुळे एक दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात इंधनाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत नागरिक मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल खरेदीसाठी गर्दी करत असल्याचं चित्र नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे. सकाळपासूनच पेट्रोल पंप मोठी गर्दी दिसून येत आहे.

अहमदनगरमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा

अहमदनगरमध्ये सकाळी अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होता. त्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली होती. सकाळी दहा वाजता पंप पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे टँकर्स हे संपामुळे येणार नसल्याची माहिती मिळताच संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेल भरून घेण्यासाठी मोठी गर्दी केली. शहरातून सर्वच पेट्रोल पंपावर कमी अधिक प्रमाणात नागरिकांची गर्दी होती तर दुसरीकडे सीएनजी वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनी श्रीगोंदापासून जवळ असलेल्या विसापूर फाटा येथे संपात सहभागी होत एकाच ठिकाणी आपली वाहने लावली. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सपोर्टच्या पार्किंगमध्ये वाहनांची गर्दी झाल्याचे दिसून आले. 

 इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढा; महसूलमंत्र्यांचे आदेश

नाशिकच्या पानेवाडी प्रकल्पातील इंधन टँकर पोलीस बंदोबस्तात बाहेर काढा, असे आदेश   महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांनी दिले आहेत. कायदा कुणी हातात घेणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देखील विखे पाटलांनी दिल्या आहेत. संध्याकाळपर्यंत परिस्थिती निवळेल अशी अपेक्षा आहे, असे विखे पाटील म्हणाले.  

याआधीही पुकारला होता संप

नागापूर ते पानेवाडी दरम्यान दुतर्फा इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि एचपीसीएल कंपन्यांच्या प्रकल्पातून इंधन वाहतूक करणारे टँकर उभे केले जातात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याने संतप्त ग्रामस्थांनी गेल्या जून महिन्यात टँकरच्या काचा फोडत चालकाला मारहाण केली होती. त्यामुळे याआधीदेखील इंधन प्रकल्पातील टँकर चालकांनी संप पुकारला होता. 

इंधन वाहतूक करणारे टँकर प्रकल्पाबाहेर रस्त्यावर उभे केले जातात. आपला क्रमांक आल्यावर टँकर आत जातात. वेगाने जाणाऱ्या टँकरने परिसरात अनेक अपघात झाले आहेत. इंधन वाहतूक करणारी वाहने महामार्गावर उभी केली जाऊ नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करावा. रस्त्यावर ते अवैधपणे उभे केल्याने अपघात झाल्यास कंपन्यांच्या अधिकाऱ्ऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे पत्र नागापूर ग्रामपंचायतीने मनमाड पोलिसांना दिले आहे. याच मुद्यावरून नागापूर ग्रामस्थ आणि टँकर चालक-मालक यांच्यात बराच वाद झाला होता.

इतर महत्वाच्या बातम्या

Truck Driver Strike LIVE: राज्यात इंधन तुटवडा उद्भवणार? हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस, राज्यात अनेक पंपांवर रांगा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : वर्दीची भीती राहिली नाही, पुणे अपघात प्रकरणी सरकारवर निशाणा ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 09 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange Full Speech : भुजबळ मला गावठी म्हणतात...मला लग्न करायचे का तुझ्या सोबत?Sharad Pawar Speech Sangli : येणाऱ्या काळात रोहितला ताकद द्या, आबांच्या लेकासाठी खुद्द पवार मैदानात

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क
गुहागरमध्ये पावसाचा कहर,मुख्य बाजारपेठेत पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 10 जणांचं स्थलांतर
Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात
Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त
Maharashtra Weather Update :राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या  जिल्ह्यात कोणता अलर्ट?
राज्यात उद्या मुसळधार पावसाचा इशारा, उद्या तुमच्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, मोरगाव भाकरे ग्रामस्थांकडून भावपूर्ण अखेरचा निरोप
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Embed widget