Sharad Pawar : मोदींची काय गॅरंटी आहे. शेतकरी उत्पन्न वाढले नाही. एकही गॅरंटी पूर्ण नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केली. तसेच्या तुमच्यापासून लढाईची सुरुवात करतोय, तुम्ही साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नाशिकच्या निफाड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, निवडणूक दोन-तीन दिवसांत जाहीर होणार आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. देशात जे चालू आहे जे घडतंय हे लोकांच्या हिताचे नाही. अनेक नेते, राज्यकर्ते बघितले, वैचारिकदृष्ट्या वेगळी भूमिका होती. मात्र लोकशाही टिकली याचा अभिमान देशाला तर आहेच पण जगालाही आहे.
त्यावेळी एका आठवड्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ
नरेंद्र मोदी यांनी काय धोरणे आखली? मनमोहन सिंग यांच्या काळात शेतीचे काम आले. धान्य आयात करण्याची मागणी झाली. धान्य आयात केल्यानं मी व्यथित झालो. स्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी आली, आम्ही त्या कुटूंबाची भेट घेतली. काय झाले विचारलं तर मुलीचे लग्न ठरले, सावकाराचे कर्ज घेतले होते त्याने तगादा लावला. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही एक आठवड्यात शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे देश परदेशातील धान्य आयात करण्याची वेळ आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
देशाच्या संविधानाची चिंता
मोदींची काय गॅरंटी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. एकही गॅरंटी पूर्ण नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रात राऊत यांनी लेखणीने सरकार विरोधात लिहिले त्यांना तुरुंगात टाकले. देशमुखांना टाकले, केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले. देश वाचवायला हवा. देशाच्या संविधानाची चिंता आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींसह शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे.
शरद पवारांचे आवाहन
सर्व लोकांनी एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि इतर पक्ष एकत्र आलो आहोत. देशाला पर्याय देऊ असे सांगितले आहे. त्याची सुरुवात तुमच्यापासून करत आहोत. इथला शेतकरी कष्टकरी आहे. तुमच्या पासून लढण्याची सुरुवात करत आहेत, तुम्ही साथ द्या, असे आवाहन शरद पवारांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे.
आणखी वाचा