Rahul Gandhi मालेगाव : काँग्रेस नेते राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज सकाळी धुळे शहरात त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यानंतर राहुल गांधी हे मालेगाव (Malegaon) शहरात दाखल झाले. मालेगावमध्ये त्यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता. रोड शो नंतर त्यांनी जाहीर सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. 


राहुल गांधी म्हणाले की, सर्वांना रमजान मुबारक. कन्याकुमारीपासून सुरु झालेली यात्रा आता मालेगावपर्यंत आली आहे. आरएसएस आणि कट्टरपंथी लोक धर्माधर्मात आणि आपापसात भांडणं लावत आहेत. मात्र हे टीव्हीवर दिसत नाही. मोदी टीव्ही वर दिसतात, पाण्यात दिसतात, नरेंद्र मोदी यांना एकसोबत सगळी नाचवायचं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. 


...तर आम्ही गरिबांचे कर्ज माफ करणार


ते पुढे म्हणाले की, आरएसएस भावा-भावात आणि राज्या-राज्यात भांडणं लावत आहेत. म्हणून नफरतच्या बाजारात मोहब्बतच दुकान खोललं आहे. गरीब महिलांसाठी आम्ही बँक खात्यात १ लाख रुपये वर्षाला देणार आहोत. ⁠नरेंद्र मोदी जर करोडपतींचे कर्ज माफ करणार असेल तर आम्ही गरिबांचे करणार आहोत, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 


काँग्रेसकडून महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा 


मोदींनी मोठ्या धूम धडाक्यात महिला आरक्षण दिले. फटाके फोडले नाचले आणि सांगितले गेले की, सर्वे पूर्ण झाल्यावर तुम्हाला आरक्षण देणार असे म्हणण्यात आले. काँग्रेसचे सरकार आल्यावर लगेच आरक्षण देणार. कोणत्याही सर्वेक्षणाची गरज नाही. सगळ्या गरीब महिलांना सरळ बँक अकाऊंटमध्ये एक लाख रुपये देणार. सरकारी नोकरीमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणार. आशा अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांना केंद्र सरकारची भागीदारी दुप्पट करणार. सावित्री बाई फुले यांच्या नावाने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेल उघडणार. प्रत्येक जिल्ह्यात हे हॉस्टेल उघडण्यात येणार आहे, अशा घोषणा काँग्रेसकडून धुळे येथे झालेल्या महिला मेळाव्यात करण्यात आल्या. 


राहुल गांधींचा मोदी सरकारवर आरोप 


देशात 22 असे लोक आहेत. ज्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे तितकीच 70 कोटी लोकांकडे आहे. 24 वर्षासाठी मनरेगासाठी जितकं बजेट लागते. तितकीच कर्ज माफी मोदी सरकारने 16 लाख करोड रुपये 22 उद्योगपतींना दिले आहे, अशी आरोप त्यांनी यावेळी मोदी सरकारवर केली आहे. 


आणखी वाचा  


Nashik Lok Sabha 2024 : हेमंत गोडसेंना उमेदवारी, शांतीगिरी महाराजांची नाराजी, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेवर महायुतीतून आक्षेप